• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Realme कंपनीच्या या हँडसेटवर बंपर डिस्काऊंट; फोनची किंमत अवघे...

Realme कंपनीच्या या हँडसेटवर बंपर डिस्काऊंट; फोनची किंमत अवघे...

फ्लिपकार्टने सुरू केलेल्या बंपर सेलमध्ये (Realme C25Y in Flipkart Big Diwali Sale) आता काही ब्रँडेड कंपन्याचे मोबाईल फोन हे चांगल्या फीचर्ससह कमी किंमतीत मिळत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : फ्लिपकार्टने सुरू केलेल्या बंपर सेलमध्ये (Realme C25Y in Flipkart Big Diwali Sale) आता काही ब्रँडेड कंपन्याचे मोबाईल फोन हे चांगल्या फीचर्ससह कमी किंमतीत मिळत आहे. त्यात ब्रँडेड आणि महागड्या कंपन्यांपासून तर ग्राहकांना कमी किंमतीत परवडेल अशाही ब्रँड्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं आता कमी किंमतीत आणि चांगल्या सुविधा असलेल्या स्मार्ट फोन घेण्याच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे. फ्लिपकार्टच्याच्या या सेलमध्ये रियलमी या कंपनीचा Realme C25Y हा स्मार्टफोन फार कमी किंमतीत मिळत असून त्यात चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळं कमी बजेट असलेल्या ग्राहकांनाही हा फोन विकत घेणं परवडणार आहे. सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव हे आहेत ऑफर्स... रियलमी कंपनीच्या C25Y हा स्मार्टफोन 4GB+64GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किेंमत 10,999 रूपये आहे तर 4GB+ 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ही 11,999 रूपये एवढी आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये या स्मार्टफोनला 128GB च्या स्टोरेजसह 10,499 रूपयांना लिस्ट करण्यात आलं आहे. जर तुम्ही ऑफरमध्ये असलेल्या SBI बँकेच्या कार्डचा वापर करून हा फोन घेतला तर त्यावर 10% का डिस्काउंटही देण्यात येत आहे. Instagram मध्ये मोठी अपडेट, आता डेस्कटॉप-लॅपटॉपवरूनही करता येणार पोस्ट Realme C25Y मध्ये आहेत हे फीचर्स Realme C25Y मध्ये Unisoc T610 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आलं असून त्यात स्मार्टफोन एंड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टमही देण्यात आली आहे. त्यातबरोबर 50MP कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि या हँडसेटसाठी ग्लेशियर ब्लू आणि मेटल ग्रे कलर या दोन कलरचा पर्याय देण्यात आला आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: