नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : WhatsApp अनेक मीडिया कंट्रोलसह येतं, जे युजर्सला आपल्यानुसार फोटो, व्हिडीओ आणि इतर मल्टीमीडिया कंट्रोल करण्याची परवानगी देतो. इन्स्टंट मेसेजिंग App युजर्सला एकाच वेळी सर्व चॅटसाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचाही पर्याय देतो. सर्वसाधारणपणे WhatsApp येणारे सर्व फोटो, व्हिडीओ डाउनलोड करतं आणि ते फोन गॅलरीमध्ये सेव्ह करतं. यामुळे डेटा संपतो शिवाय तुमच्या फोनचं स्टोरेजही कमी होतं.
परंतु WhatsApp कडे आणखी एक पर्याय आहे, ज्याला मीडिया व्हिजिबिलिटी (Media Visibility) म्हटलं जातं. हा ऑप्शन बंद करता येतो. यामुळे फोनवर ऑटोमॅटिक फोटो आणि व्हिडीओ डाउनलोड होणं बंद होतं. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
- WhatsApp चं नवं वर्जन असणं आवश्यक आहे.
- WhatsApp Account अॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे.
WhatsApp वर ऑटो-डाउनलोड कसं बंद कराल?
- WhatsApp ओपन करा आणि वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करुन Settings मध्ये जा.
- इथे Storage and data वर टॅप करा आणि Media Auto-download सेक्शनमध्ये जा.
इथे पुढील बदल करा -
- मोबाईल डेटाचा वापर करताना सर्व बॉक्स अनचेक करा.
- Wifi कनेक्ट झाल्यास - सर्व बॉक्स अनचेक करा.
- रोमिंगवेळीही सर्व बॉक्स अनचेक करा.
सर्व चॅटसाठी मीडिया व्हिजिबिलिटी कसं बंद कराल -
- Settings मध्ये Chat मध्ये जा.
- मीडिया व्हिजिबिलिटी ऑफ करा.
पर्सनल चॅटसाठी Media Visibility कसं बंद कराल?
- ज्या चॅटसाठी मीडिया व्हिजिबिलिटी बंद करायचं आहे, त्या चॅटवर क्लिक करा. त्या प्रोफाईलमध्ये जावून Media Visibility बंद करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.