Google Smartphone मध्ये विचित्र गडबड, आपोआप लागतात Calls; हा काय प्रकार आहे…युजर्सची प्रतिक्रियानवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वीच Google ने लॉन्च केलेल्या Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro या स्मार्टफोन्सची कॅमेरा आणि इतर फीचर्समुळे फार चर्चा झाली होती. परंतु आता या स्मार्टफोन्सच्या युजर्सना एका भलत्याच अडचणीला (Calling starts automatically on Google Pixel 6 Pro and Google Pixel 6) सामोरं जावं लागत आहे. अनेक लोकांनी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आपोआप कॉलिंग होत असल्याची आणि डिस्प्ले अचानक चालू-बंद होत असल्याची तक्रार केली आहे. Reddit वर Google Pixel स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या या अडथळ्यांची तक्रार युजर्सनी केली होती. त्यात आता कर्कश आवाज असलेल्या ठिकाणी हे प्रकार घडत असावेत असाही तर्क लावला जात होता. परंतु काही युजर्स आपल्या घरात शांतपणे बसलेले असतानाही त्यांना या समस्येला सामोरं जावं लागलेलं आहे.
स्मार्टफोन 15 दिवस वापरा, आवडला नाही तर परत करा; Flipkart ची धमाकेदार ऑफर
या आहेत समस्या Google Pixel 6 आणि Google Pixel 6 Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आपोआप कॉलिंग होण्याशिवाय Display Flickr होत असल्याच्याही लोकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे स्क्रिन चालू आणि (Google Pixel Smartphone making calls on its own) बंद होत असून स्मार्टफोनचा वापर करणंही कठीण झाल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.
15000 हून कमी किंमतीत खरेदी करता येतील हे 5 Smartphone; पाहा फीचर्स
या सर्व तक्रारी पब्लिक फोरमवर दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही Google कंपनीकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.