मुंबई, 7 नोव्हेंबर : स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेक सगळेच खुप कन्फुज असतात. कारण आपल्याला आवडणारे फोन आपण वापरलेले नसतात. मात्र एखादा फोन खरेदी करताना तुम्हाला 15 वापरायला मिळाला आणि आवडला नाहीत तर परत करण्याची मुभा दिली कसं वाटेल? फ्लिपकार्टने ही सुविधा सुरु केली आहे. फ्लिपकार्टने (Flipkart) गुरुवारी 'Love it or return it' कार्यक्रम जाहीर केला. जी की प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची एक नवीन पद्धत आहे.
जेव्हा यूजर्स Flipkart वरून हाय-एंड स्मार्टफोन खरेदी करतात, तेव्हा तुम्ही 15 दिवसांच्या आत खरेदी केलेला फोन रिटर्न करुन पुन्हा पैसे मिळवू शकता. या पायलट प्रोजेक्टचा एक भाग म्हणून, फ्लिपकार्टने सॅमसंगशी करार केला आहे आणि Galaxy Z Flip 3 आणि Z Fold 3 हे दोन्ही या प्रोग्रामचा भाग असतील. हे दोन्ही फोन ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असतील. प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी 'लव्ह इट ऑर रिटर्न इट' प्रोग्राम कसा असेल याची माहिती घेऊया.
जेव्हा तुम्ही प्रीमियम दर्जाचा महागडा स्मार्टफोन खरेदी करता, तेव्हा तुम्हाला फ्लिपकार्टकडून खात्री दिली जाते की तुम्हाला ते डिव्हाईस आवडत नसल्यास, तुम्ही ते परत करू शकता आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत.
Twitter वर येणार हे भन्नाट अपडेट; युजर्सला twitter space या पद्धतीनंही करता येणार Join
यासाठी, कंपनी यूजर्सना 15 दिवसांचा अवधी देखील देईल जेणेकरुन त्यांना फोन सोबत ठेवायचा की नाही हे ठरवू शकतील. तुम्ही तुमच्या नवीन स्मार्टफोनबद्दल कोणत्याही कारणास्तव असमाधानी असल्यास, तुम्ही तो Flipkart वर परत करू शकता.
यूजरने एकदा का फोन रिटर्न केला की गुणवत्ता तपासणीनंतर बँक खात्यात स्मार्टफोनच्या खरेदी किंमतीवर संपूर्ण परतावा मिळेल. फ्लिरकार्टचा हा प्रोग्राम बंगळुरू, पुणे, हैदराबाद, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आणि वडोदरा सारख्या शहरांमध्ये सुरू आहे. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्ट अॅप तपासा.
WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार
'लव्ह इट ऑर रिटर्न इट' प्रोग्राम फक्त सॅमसंग फोनसाठी आहे का?
तर याचं उत्तर होय आहे. आत्तापर्यंत फ्लिपकार्टने 'लव्ह इट ऑर रिटर्न इट' प्रोग्रामबाबत सॅमसंगशी करार केला आहे. या कंपनीचे दोन नवीन फोन सामील आहेत. एक Galaxy Z Flip 3 आणि दुसरा Galaxy Z Flip 3 फोन आहे. Samsung कंपनीच्या Galaxy S सीरीजचे फोन या प्रोग्रामचा भाग नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Flipkart, Smartphone