नवी दिल्ली, 1 जुलै: कोरोना महामारीमुळे जगभरात अनेक लोक चिंतेत आहे, घाबरलेले आहेत. याचा ताणही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. लोकांच्या चेहऱ्यावरील हाच तणाव दूर करण्यासाठी चिनी कंपनी कॅननने (Canon) आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तयार केलं आहे. ही नवी AI टेक्नोलॉजी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणेल, असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेरा बनवणारी कंपनी कॅनन नेहमी इनोवेटिव्ह प्रोडक्ट्स बनवते. कंपनीने भविष्यातील टेक्नोलॉजीसाठीही अनेक पेटेंट्स केले आहे. आता कंपनीने असा कॅमेरा डिझाईन केला आहे, जो ऑफिसच्या कर्मचाऱ्यांची स्माईल, त्यांचं हसू ट्रॅक करेल. कॅमेराच्या या टेक्नोलॉजीमुळे कोणता कर्मचारी किती खूश आहे, हेदेखील समजेल. ऑफिसमध्ये लावला कॅमेरा - कॅननने या कॅमेराची सुरुवात आपल्या ऑफिसपासून केली आहे. यात स्माईल रिकॉग्निशन टेक्नोलॉजीचा वापर केला असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. हा कॅमेरा कर्मचाऱ्याचा स्माईली फेस ओळखेल आणि त्यानंतरच त्याला ऑफिसमध्ये एन्ट्री देईल. यामुळे कर्मचाऱ्यांना 100 टक्के खूश ठेवता येईल आणि जे लोक तणावात आहेत त्यांनाही आनंदात ठेवण्यास मदत होईल, असंही कंपनीने म्हटलंय.
(वाचा - डेटा चोरी टाळण्यासाठी Strong Password कसा निवडाल? जाणून घ्या टिप्स )
चिनी कंपन्या या AI टेक्नोलॉजीच्या मदतीने आपल्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवत आहेत. फायनेंशियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी CCTV कॅमेराद्वारे कोणता कर्मचारी किती वेळ लंच ब्रेक घेतो हेदेखील पाहेल. स्माईल रिकॉग्निशन टेक्नोलॉजीचा खुलासा 2020 मध्ये केल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. परंतु त्यावेळी ही टेक्नोलॉजी प्रसिद्ध नव्हती.
(वाचा - Google Drive वर चुकूनही स्टोर करू नका या गोष्टी; होईल कारवाई, कंपनीकडून इशारा )
कंपनीचे कर्मचारी नाराज - यामुळे ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे, तसंच कर्मचाऱ्याच्या भावनांशी खेळलं जात आहे, कारण कधी आनंदात नसतानाही कॅमेरासमोर हसावं लागत असल्याचं काहींचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.