नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : एयर इंडियानंतर (Air India) आता आणखी एक सरकारी कंपनी (Government Company) टाटा ग्रुपची (TATA Group) होणार आहे. सरकारने याला मंजुरीही दिली आहे. सरकारने सोमवारी नीलाचल इस्पात निगम लिमिटेडला (NINL) टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्स विक्री करण्याची मंजुरी दिली आहे. आर्थिक कॅबिनेट समितीने 93.71 टक्के शेअर्ससाठी टाटा स्टील लाँग प्रोडक्ट्सच्या सर्वोच्च बोलीला मंजुरी दिली आहे. हा करार सुमारे 12100 कोटी रुपयांचा असेल. NINL हा चार CPSE आणि ओडिशा सरकारच्या (Government of Odisha) दोन राज्य सार्वजनिक उपक्रमांचा जॉईंट वेंचर आहे. सरकारच्या या कंपनीत कोणतीही इक्विटी नाही. एका अधिकृत माहितीनुसार, PSU मंडळाच्या विनंतीवर आणि ओडिशा सरकारच्या संमतीच्या आधारावर CCEA ने 8 जानेवारी 2020 रोजी NINL च्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीला तत्त्वत: मान्यता दिली होती. तसंच निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थारन विभागाला व्यवहार करण्यासाठी अधिकृत केलं होतं. NINL 4 CPSE - MMTC, NMDC, BHEL, MECON आणि 2 ओडिशा सरकारचे PSU - OMC आणि IPICOL हे संयुक्त उपक्रम आहेत.
हे वाचा - Budget 2022 LIVE: पुढील 5 वर्षात मिळणार 60 लाख रोजगार- अर्थमंत्री
NINL चा कलिंगनगर ओडिशा इथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा एक स्टील प्लाँट आहे. कंपनीचं नुकसान होत असून 30 मार्च 2020 पासून प्लाँट बंद आहे. कंपनीवर मागील वर्षी 31 मार्चपर्यंत 6600 कोटीहून अधिक कर्ज आहे. यात प्रमोटरचं 4116 कोटी रुपये, बँकेचं 1741 कोटी रुपये आणि इतर कर्जदार आणि कर्मचाऱ्यांची मोठी देणी बाकी आहेत. 31 मार्च 2021 पर्यंत कंपनीला 4228 कोटींचं नुकसान झालं आहे.
हे वाचा - Budget 2022 : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी डिजिटल सेवा दिली जाईल : अर्थमंत्री
ओडिशा सरकारची होती 32.47 टक्क्यांची भागीदारी - अधिकृत माहितीनुसार, ओडिशा सरकारसह (Government of Odisha) त्यांच्या OMC आणि IPICOL या कंपन्यांचाही यात समावेश होता. यात त्यांची 32.47 टक्के भागीदारी होती. परंतु आता सरकारच्या मंजुरीनंतर, या करारामुळे Air India नंतर मोठ्या घाट्यात असलेली ही सरकारी कंपनी रतन टाटांच्या नावे होणार आहे.