मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ही आहे जगातील सर्वात महाग वस्तू, Calculator वरही मावत नाही रकमेचा आकडा

ही आहे जगातील सर्वात महाग वस्तू, Calculator वरही मावत नाही रकमेचा आकडा

जगातील सर्वात महाग वस्तूच्या (Know about costliest thing in the universe) किंमतीचा आकडा हा कॅलक्युलेटरवही मावत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

जगातील सर्वात महाग वस्तूच्या (Know about costliest thing in the universe) किंमतीचा आकडा हा कॅलक्युलेटरवही मावत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

जगातील सर्वात महाग वस्तूच्या (Know about costliest thing in the universe) किंमतीचा आकडा हा कॅलक्युलेटरवही मावत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 7 नोव्हेंबर: जगातील सर्वात महाग वस्तूच्या (Know about costliest thing in the universe) किंमतीचा आकडा हा कॅलक्युलेटरवही मावत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. जगातील सर्वात महागडी गोष्ट कुठली, असा प्रश्न कुणाला विचारला, तर प्रत्येकजण त्याचं वेगवेगळं उत्तर देईल. एखाद्याला वाटेल की जगातील एखादा हिरा सर्वात (costly things in the world) महाग असेल, तर काहींना वाटेल् की बुर्ज खलिफा ही इमारत सर्वात महाग असेल. एखाद्याला कुणा उद्योगपतीचा अलिशान बंगला महाग वाटेल तर काहींना एखाद्या ऐतिहासिक वस्तूची किंमत सर्वाधिक आहे, असं वाटेल. मात्र यापैकी सगळी उत्तरं चुकीची आहे. जगात सर्वात महाग काय आहे, याचा नुकताच (International space station is costliest thing) खुलासा करण्यात आला असून त्याचं उत्तर आहे स्पेस स्टेशन.

स्पेस स्टेशन सर्वात महाग

जगातील सर्वात महागडी वस्तू ही पृथ्वीच्या कक्षेबाहेर असल्याचं स्पष्ट झालं आहे. ती गोष्ट आहे स्पेस स्टेशन. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची किंमत ही 150 बिलियन डॉलर एवढी आहे. म्हणजेच 15 हजार कोटी डॉलर. डॉलरचा हा आकडा जर रुपयांत मोजायला झाला, तर ही रक्कम कॅलक्युलेटरच्या एका स्क्रीनमध्ये मावणंही अशक्य आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हीच जगातील सर्वाधिक महागडी गोष्ट असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. यापेक्षा अधिक किंमतीची कुठलीही गोष्ट पृथ्वीवर किंवा पृथ्वीबाहेर उपलब्ध असल्याचं आढळून आलेलं नाही.

हे वाचा- झेब्राच्या पिल्लावर वाघिणीचा हल्ला, जीवावर उदार होत आईनं दिली झुंज, पाहा VIDEO

अनेक देशांचं फंडिंग

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसाठी अनेक देशांनी फंडिंग केल्याचं दिसून आलं आहे. या स्टेशनच्या देखभालीसाठीच नासाला दरवर्षी 400 कोटी रुपयांचा खर्च येतो. स्पेश स्टेशन सेटअप करणं इतकं अवघड होतं की कुठल्याही एका देशाला ही बाब परवडणारी नव्हती. त्यासाठी अनेक देशांच्या पुढाकारानं स्पेश स्टेशनची निर्मिती झाली. नोव्हेंबर 2000 पासून सुरू झालेल्या या स्पेस स्टेशनमध्ये अनेक देशांचे शास्त्रज्ञ येतात आणि अंतरातील विविध ग्रहांचा अभ्यास करू शकतात.

स्पेस स्टेशनवर मिरची

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर मिरचीचं पिक घेण्याचा प्रयोग काही शास्त्रज्ञांनी नुकताच यशस्वी केला होता. या मिरचीची एक रेसिपीदेखील बनवण्यात आली होती. जगातील या सर्वात महागड्या ठिकाणाहून विज्ञानातील अनेक शोध लावले जातात.

First published:

Tags: Science, Space Centre