Home /News /technology /

TVS XL 100: 7999 रुपये डाऊन पेमेंट करून घरी आणा ही स्कूटर, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स

TVS XL 100: 7999 रुपये डाऊन पेमेंट करून घरी आणा ही स्कूटर, जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स

तुम्ही स्वत:ची टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर TVS मोटर इंडिया तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत. तुम्ही जास्त मायलेज असणारी आणि स्वस्त टू-व्हीलर खरेदी करू शकता.

    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: तुम्ही स्वत:ची टू-व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर TVS मोटर इंडिया तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आले आहेत. तुम्ही जास्त मायलेज असणारी आणि स्वस्त टू-व्हीलर खरेदी करू शकता. सध्या तुमच्याकडे ही संधी आहे. कंपनीने टीव्हीएस XL 100 वर शानदार ऑफर आणली आहे. ही टू-व्हीलर तुम्ही केवळ 7999 रुपयांचं डाऊन पेमेंट करून खरेदी करू शकता. यासह तुम्हाला या बाइकवर ईएमआय (EMI)चा पर्याय देखील मिळेल. याशिवाय टीव्हीएस इतरही काही ऑफर देत आहे. जाणून घ्या सविस्तर... TVS XL 100 चे फीचर्स कंपनीचा असा दावा आहे की ही टू-व्हीलर इतर वाहनांच्या तुलनेत 15 टक्के जास्त मायलेज देते. टीव्हीएसने यामध्ये मोबाइल चार्जिंगचा पर्यायही दिला आहे. ही टू-व्हीलर ड्युअल टोन कलरमध्ये बाजारात उपलब्ध आहे. हे वाचा-Drone Shoot करायचंय? ड्रोन उडवण्यासाठी मोदी सरकारने आणलेत नवीन नियम TVS XL 100 वर मिळेल ऑफर ही टू-व्हीलर तुम्ही केवळ 7999 रुपये डाऊन पेमेंट देऊन खरेदी करू शकता. तुम्ही ही टू-व्हीलर खरेदी करताना पेटीएम द्वारे देखील पेमेंट करू शकता. पेटीएमवरून पेमेंट केल्यास तुम्हाला 4500 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय कंपनी तुम्हाला 1,555 रुपयांचा पर्याय देखील देत आहे. हे वाचा-आवाजाच्या फिल्ट्रेशनसह Nothing Ear 1 Earbuds ऑफरमध्ये खरेदीची संधी,काय आहे किंमत TVS XL 100 चे इंजिन TVS XL 100 या टू-व्हीलरमध्ये कंपनीने 100cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 4.3 bhp ची पॉवर आणि 6.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. किंमतीबाबत बोलायचे झाले तर ही टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 49,999 रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Tech news

    पुढील बातम्या