मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आवाजाच्या फिल्ट्रेशनसह Nothing Ear 1 Earbuds ऑफरमध्ये खरेदीची संधी, पाहा काय आहे किंमत

आवाजाच्या फिल्ट्रेशनसह Nothing Ear 1 Earbuds ऑफरमध्ये खरेदीची संधी, पाहा काय आहे किंमत

गेल्या आठवड्यात Nothing Ear (1) Earbuds प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आले होते, अवघ्या काही मिनिटांतच त्यांचं बुकिंग फुल झालं होतं. आता 31 ऑगस्टपासून हे Earbuds फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

गेल्या आठवड्यात Nothing Ear (1) Earbuds प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आले होते, अवघ्या काही मिनिटांतच त्यांचं बुकिंग फुल झालं होतं. आता 31 ऑगस्टपासून हे Earbuds फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

गेल्या आठवड्यात Nothing Ear (1) Earbuds प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात आले होते, अवघ्या काही मिनिटांतच त्यांचं बुकिंग फुल झालं होतं. आता 31 ऑगस्टपासून हे Earbuds फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : OnePlus चे सहसंस्थापक Carl Pei’s यांच्या नथिंग (Nothing’s) या नव्या कंपनीतर्फे Nothing Ear (1) हे नवे ट्रू वायरलेस स्टिरिओ इअरबड्स (TWS Earbuds) लाँच करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात ते प्री-बुकिंगसाठी (Pre-Booking) उपलब्ध करण्यात आले होते, अवघ्या काही मिनिटांतच त्यांचं बुकिंग फुल झालं होतं. आता 31 ऑगस्टपासून हे Earbuds फ्लिपकार्टवर (Flipkart) खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. भारतात याची किंमत 5999 रुपये असून, काही ऑफर्समुळे यापेक्षाही कमी किमतीत ग्राहकांना या इअरबड्सची खरेदी करता येतील.

अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation), 34 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप अशी वैशिष्ट्यं असलेले हे इअरबड्स चार्जिंग केससह उपलब्ध होणार आहेत. केवळ फ्लिपकार्ट असलेल्या या इअरबड्सच्या सेलमध्ये ग्राहकांना कॅशबॅक आणि अन्य डिस्काउंट्सचा (Discounts) लाभ घेता येईल. तसंच, एक्सचेंज ऑफरही (Exchange Offer) कंपनीतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे.

एक्सचेंज ऑफरअंतर्गत ग्राहकांना त्यांच्याकडे असलेले जुने वायरलेस इअरबड्स एक्सचेंज करता येणार आहेत. एक्सचेंज केल्यास नव्या इअरबड्सवर 300 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसंच, काही विशिष्ट इअरबड्स मॉडेलच्या एक्सेंजवर 150 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटही मिळणार आहे. तसंच, सध्या Nothing Ear (1) या इअरबड्सच्या खरेदीवर 500 रुपयांचा डिस्काउंटही दिला जाणार आहे. त्यामुळे एक्सचेंजशिवाय या इअरबड्सची किंमत 5499 रुपये, तर एक्सचेंजसह या इअरबड्सची किंमत 5199 रुपये एवढी असेल.

Online Fraudपासून वाचण्यासाठी आता शॉपिंगवेळी असं कराव लागेल पेमेंट,काय होणार बदल

याशिवाय फ्लिपकार्टवर हे इअरबड्स खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा (No Cost EMI) पर्यायही उपलब्ध आहे. खरेदीसाठी ग्राहक कोणतं क्रेडिट कार्ड वापरतात, त्यावर ईएमआयचा कालावधी वेगवेगळा असेल.

तुमच्या कामाची बातमी!प्रवासाआधीच समजणार Toll ची किंमत,Google Maps चं भन्नाट फीचर

Nothing Ear (1) या इअरबड्समध्ये 11.6 डायनॅमिक ड्रायव्हर्स (Dynamic Drivers) असून, सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ट्रू वायरलेस इअरबड्सच्या तुलनेत हे मोठे आहेत. या इअरबड्समध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनची ( ANC) सुविधा आहे. अँड्रॉइड आणि अ‍ॅपल स्मार्टफोनला जोडलं जाण्यासाठी या इअरबड्सना v5.2 ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. ANC ची लेव्हल अ‍ॅडजस्ट करण्यासाठी दोन मोड्स उपलब्ध आहेत. लाइट मोडमध्ये मध्यम स्वरूपाचं नॉइज कॅन्सलेशन होतं. मॅक्झिमम मोडमध्ये 40 डेसिबलपर्यंतच्या आवाजाचं फिल्ट्रेशन होऊ शकतं. बाहेरच्या आवाजांसह नॉर्मल मोड सुरू करण्यासाठी युजर्स ट्रान्सपरन्सी मोड अ‍ॅक्टिव्हेट करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Tech news