जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter लाँच; केवळ 2 हजारांत बुक करता येणार, पाहा फीचर्स

जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter लाँच; केवळ 2 हजारांत बुक करता येणार, पाहा फीचर्स

जगातील सर्वात स्वस्त Electric Scooter लाँच; केवळ 2 हजारांत बुक करता येणार, पाहा फीचर्स

जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Detel easy plus टू-व्हिलर Detel कंपनीने लाँच केली आहे. ही स्कूटर केवळ 2000 रुपयांत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर बुक करता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मार्च : नवी टू-व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असला, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Detel easy plus टू-व्हिलर Detel कंपनीने लाँच केली आहे. ही स्कूटर केवळ 2000 रुपयांत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर बुक करता येणार आहे. या स्कूटरची एक्स शो रुम किंमत 39,999 रुपये आहे. या किंमतीसह ही जगातील सर्वात स्वस्त स्कूटर असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. याआधी Detel ने जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीही लाँच केला होता.

(वाचा -  फोन पाण्यात पडल्यानंतर होऊ नका पॅनिक; काय करावं, काय नाही? जाणून घ्या या टीप्स )

कंपनीने या इलेक्ट्रिक टू-व्हिलरमध्ये 250W आणि 48V 12AH LiFeP04 (लीथियम आयन फॉस्फेट) ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो. कंपनीने यासह दोन वर्षांची स्टँडर्ड वॉरंटीही दिली आहे, जी 40000 किलोमीटरपर्यंत वैध आहे. कंपनी या टू-व्हिलरसह प्रीपेड रोडसाईड असिस्टेंस पॅकेज आणि फ्री हेल्मेटही देते.

(वाचा -  जुन्या वाहनांच्या RC रिन्यूवलचा खर्च अनेक पटीने वाढणार; असा आहे सरकारचा प्लॅन )

सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 60 किमीपर्यंत रेंज देते. याची लोड कॅपेसिटी 170 किलोग्रॅम आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटरचा ग्राउंड क्लिअरेंस 170mm आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 25kmph आहे. कंपनीकडून ही स्कूटर 5 कलर वेरिएंटमध्ये मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक रेड, मेटॅलिक यलो, गनमेटल आणि पर्ल व्हाईट रंगात ही स्कूटर लाँच झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात