नवी दिल्ली, 21 मार्च : तुमच्याकडे 15 वर्ष जुनी कार किंवा इतर कोणतं वाहन असल्यास, त्या वाहनाच्या RC रिन्यूवलसाठी अधिक पैसे द्यावे लागू शकतात. सरकारने केंद्रीय मोटर वाहन नियम 2021 जारी केला असून 1 ऑक्टोबरपासून तो लागू केला जाणार आहे.
रस्ते परिवहन मंत्रालयाने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करत, यावर्षाच्या अखेरपर्यंत जुनी वाहनं ठेवणं किती महाग होऊ शकतं याबाबत माहिती दिली आहे. हे नोटिफिकेशन सरकारकडून जारी करण्यात आलेल्या वाहन स्क्रॅपेज पॉलिसीचा भाग आहे. या स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 20 वर्षांहून अधिक जुनी पॅसेंजर वाहनं आणि 15 वर्ष जुन्या कमर्शियल वाहनांना फिटनेस टेस्ट करणं अनिवार्य आहे.
नोटिफिकेशननुसार, कारच्या RC रिन्यूवलसाठी कार मालकाला 5000 रुपये द्यावे लागतील. तसंच बाईक मालकाला सध्या लागणाऱ्या 300 रुपयांऐवजी 1000 रुपये द्यावे लागतील. यात सर्वात कठिण परिस्थिती बस आणि ट्रक मालकांची होऊ शकते, ज्यात 15 वर्ष जुन्या बस किंवा ट्रकच्या फिटनेस रिन्यूवल सर्टिफिकेटसाठी 21 टक्के अधिक चार्ज द्यावा लागेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर त्यांना 12,500 रुपये द्यावे लागतील.
हे बदल स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत केले जात आहेत आणि या प्रपोजलनुसार, रिन्यूवलसाठी उशीर झाल्यास, 300 ते 500 रुपये प्रति महिना दंड भरावा लागू शकतो. त्याशिवाय कमर्शियल वाहनांसाठी प्रतिदिन 50 रुपये दंड लागू शकतो.
रजिस्ट्रेशनसाठीचा बाईकचा रेट 300 रुपये ठेवण्यात आला आहे, तर रिन्यूवल रेट 1000 रुपये असेल. थ्री व्हिलरसाठी रजिस्ट्रेशन रेट 600 रुपये आणि रिन्यूवल रेट 2500 रुपये असेल.
कमर्शियल वाहनांमध्ये मोटरसायकलसाठी फिटनेस सर्टिफिकेट चार्ज 500 रुपये असेल, तर रिन्यूवल किंमत 1000 रुपये द्यावी लागू शकते. थ्री व्हिलरसाठी नवीन सर्टिफिकेट 1000 रुपये तर रिन्यूवलसाठी 3500 रुपये द्यावे लागतील.
टॅक्सी, कॅबसाठी फिटनेस सर्टिफिकेट चार्ज 1000 रुपये आणि रिन्यूवल चार्ज 7000 रुपये द्यावा लागू शकतो. बस आणि ट्रकसाठी फिटनेस सर्टिफिकेट 1500 रुपये आणि याची रिन्यूवल कॉस्ट 12500 रुपये द्यावी लागू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.