Home /News /technology /

फोन पाण्यात पडल्यानंतर होऊ नका पॅनिक; काय करावं, काय नाही? जाणून घ्या या टीप्स

फोन पाण्यात पडल्यानंतर होऊ नका पॅनिक; काय करावं, काय नाही? जाणून घ्या या टीप्स

फोन पाण्यात पडला तर? फोन पाण्यात पडल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर पॅनिक न होता काही टीप्सने तो पुन्हा आधीच्या चांगल्या स्थितीत पूर्ववत करता येऊ शकतो.

  नवी दिल्ली, 21 मार्च : स्मार्टफोन ही सर्वांसाठीच महत्त्वाची गोष्ट झाली आहे. फोन कोणताही असो आणि कितीही जुना असला तरी तो प्रत्येकासाठी गरजेचा झाला आहे. अशात फोन पाण्यात पडला तर? सध्या बाजारात अनेक वॉटरप्रुफ फोन उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येकाकडेच वॉटरप्रुफ फोन नसतो. फोन पाण्यात पडल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर पॅनिक न होता काही टीप्सने तो पुन्हा आधीच्या चांगल्या स्थितीत पूर्ववत करता येऊ शकतो. - फोन पाण्यात भिजल्यानंतर तो लगेचच ऑन करण्याची चूक कधीही करू नका. फोन चालू स्थितीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी अनेक जण लगेच फोन चालू करण्याचा प्रयत्न करतात किंवा ऑन करतात. परंतु असं कधीही करू नये. - तसंच त्याचवेळी फोन चार्ज करण्याचाही प्रयत्न करू नका. फोनला हेअर ड्रायरने सुकवू नका. हेअर ड्रायरमधून अतिशय गरम हवा निघते, ती फोनच्या पार्ट्ससाठी नुकसानकारक ठरू शकते. तसंच नॉर्मल हवा देतानाही पाणी फोनच्या त्या भागात पोहचू शकतं, जिथे आधी पोहचलं नसेल. त्यामुळे फोन अधिक डॅमेज होऊ शकतो.

  (वाचा - जुन्या वाहन मालकांसाठी खूशखबर! Scrappage Policy बाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा)

  - फोन पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सर्वात आधी तो ऑन असेल, तर त्याला ऑफ करा. फोनमधून सीम कार्ड आणि मायक्रो-एसडी कार्डला रिमूव्ह करा. जर फोनची बॅटरी रिमूव्हवेबल असेल तर तीदेखील काढावी. शक्य असल्यास, नॉन-रिमूव्हवेबल बॅटरीवाल्या फोनला मोबाईल रिपेयरिंग शॉपमधून नेऊन त्याची बॅटरी रिमूव्ह करा. - बॅटरी रिमूव्ह झाल्यामुळे फोन डॅमेज होण्याची शक्यता अतिशय कमी होते.

  (वाचा - हरवलेला फोन कसा शोधाल? डिलीटही करू शकता चोरी झालेल्या फोनचा डेटा)

  - कपड्याच्या मदतीने फोन सुकवा. त्यानंतर फोन तांदळामध्ये आतपर्यंत टाका आणि सोडून द्या. फोन सुकवण्यासाठी ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. फोन तांदळात कमीत-कमी 24 तास ठेवावा. त्यानंतर फोन ऑन होतो की नाही, ते तपासा.

  (वाचा - Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail)

  - फोन ऑन न झाल्यास, त्याची बॅटरी खराब झालेली असू शकते. फोन ऑन होत असेल, तर फोनमध्ये गाणी किंवा व्हिडीओ लावून फोनचे स्पीकर काम करतात की नाही ते चेक करा.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या