मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लोन, क्रेडिट कार्ड सततच्या Spam Calls चा कंटाळा आला? असे करा Block

लोन, क्रेडिट कार्ड सततच्या Spam Calls चा कंटाळा आला? असे करा Block

spam calls

spam calls

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला सतत स्पॅम कॉल, नको असलेले कंपनीचे, लोनसाठी, क्रेडिट कार्डसाठी असे गोष्टींचे कॉल येत असतात. पण तुम्ही या कॉलपासून वाचू शकता.

नवी दिल्ली, 27 मे : स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला सतत स्पॅम कॉल, नको असलेले कंपनीचे, लोनसाठी, क्रेडिट कार्डसाठी, इन्शुरन्ससाठी असे गोष्टींचे कॉल येत असतात. एखाद्या अगदी महत्त्वाच्या कामात असतानाच नेमके Spam Calls येतात. या कॉल्सला अनेकजळ कंटाळलेले असतात. यामुळे केवळ व्यक्ती डिस्टर्ब होत नाही, तर ते अनेकदा स्कॅम करण्याचाही प्रयत्न केला जातो.

पण तुम्ही या कॉलपासून वाचू शकता. या कॉल्सचे दोन प्रकार असतात. एक Robo Call असतो. यात असे कॉल्स येतात ज्यात युजर्सला प्री-रेकॉर्डेड मेसेज ऐकवला जातो. त्यानंतर एक टेलिमार्केटिंग कॉल्स असतात. याचा वापर कंपन्या आपले प्रोडक्ट्स आणि सर्विस विक्रीसाठी करतात. तिसरा एक कॉल असतो, जो केवळ फायनेंशियल स्कॅम करण्याच्या उद्देशानेच केला जातो. अशा कॉल्सपासून तुम्ही वाचू शकता. Google स्पॅम कॉल्सपासून सुरक्षित राहण्यासाठी अँड्रॉइड युजर्सला दोन फीचर्स देतं.

यात एक Caller ID आणि स्पॅम प्रोटेक्शन आहे जे अँड्रॉइड फोनसाठी डिफॉल्ट ऑन असतं. युजर्स ते बंदही करू शकतात. तुमच्या अँड्रॉइड फोनवर Phone App ओपन करावं लागेल.

हे वाचा - या नंबरवर चुकूनही Call करू नका, WhatsApp Account हॅक होण्याचा धोका

त्यानंतर More वर टॅप करावं लागेल. त्यानंतर Setting वर क्लिक करा. आता स्क्रिनवर Spam and Call Screen चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावं लागेल. जर इथे Caller and Spam ID बंद असेल, तर ते ऑफ करा.

त्याशिवाय तुम्ही कॉल स्पॅम मार्कही करू शकता. त्यासाठी फोन App ओपन करुन बॉटममध्ये Recent टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अशा कॉलवर टॅप करा ज्याला तुम्ही स्पॅम रिपोर्ट करू इच्छिता. आता Block or Report स्पॅमवर टॅप करा.

First published:

Tags: Smartphone, Tech news