नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : जगभरात मेसेजिंगसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भारतातही WhatsApp युजर्सची संख्या (WhatsApp) कोटींच्या घरात आहे. व्हॉट्सअॅपमध्ये युजरलाा ब्लॉक करण्याचं फीचर आहे. यात युजर्सला दुसऱ्या युजर्ससोबत चॅटिंग आणि कॉलिंगसाठी ब्लॉक (block checker on WhatsApp) करता येतं. परंतु अनेकदा युजर्सला कुणी कुणी त्याला ब्लॉक केलं आहे हे कळत नाही.
युजर्सला कुणी ब्लॉक केलंय याची माहिती व्हॉट्सअॅप कधीही देत नाही. परंतु काही ट्रिक्सद्वारे युजर्सला कुणी ब्लॉक केलं आहे. याची माहिती मिळू शकते. जर युजरचा नवा प्रोफाइल फोटो किंवा त्याचा लास्ट सीन तु्म्हाला दिसत नसेल तर त्याने तुम्हाला (how to know who blocked you on whatsapp) ब्लॉक केलं असण्याची शक्यता असते.
संबंधित व्यक्तीने युजरला ब्लॉक केल्यानंतर ज्यावेळी त्याने ब्लॉक केलं आहे त्यावेळचाच प्रोफाइल फोटो युजरला दिसत असतो. त्यानंतर त्यानं कितीही फोटो अपडेट केले, तरी ते ब्लॉक केलेल्या युजर्सला दिसत नाही. त्याचबरोबर एकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवला तर त्यावर फक्त मेसेज सेंड होतो.
म्हणजे त्या मेसेजवर सेंड झाल्याची एक टिक येते. तो मेसेज डिलीव्हर किंवा सीन होणार नाही. जेव्हा ब्लॉक केलेल्या व्यक्तीला युजर्सने एखाद्या WhatsApp Group वर Add करण्याचा प्रयत्न केला तर तो add होणार नाही. कारण त्यानं संबंधित युजर्सला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलेलं असतं. त्यामुळं आता तुम्हालाही कुणी ब्लॉक केलं असेल तर या ट्रिक्स वापरून कुणी कुणी ब्लॉक केलं आहे याची माहिती घेऊ शकता.
दरम्यान आता व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स (New Features) आणि अपडेट्स (Updates) आणले आहेत. दिवाळीच्या, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने आपल्या वेब वर्जनसाठी Photo Edit , Stickers आणि Link Preview चे असे तीन फीचर्स लाँच केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.