नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : तुम्ही कधी Vishing बाबत ऐकलंय का? Vishing हा हॅकर्सकडून फसवणुकीसाठी वापरला जाणारा प्रकार आहे. Vishing द्वारे हॅकर्स (Hackers), सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) तुमच्या फोनद्वारे खासगी आणि संवेदनशील माहिती मिळवतात. या माहितीमध्ये युजर आयडी, लॉगइन, ट्रान्झेक्शन पासवर्ड, OTP (One Time Password), URN (Unique Registration number), कार्ड पिन, CVV अशा गोष्टींचा समावेश असतो.
स्कॅम करणारा फोनवर स्वत:ला बँकर असल्याचं सांगतो आणि लोकांची फसवणूक करुन त्यांचे खासगी आणि फायनेंशियल डिटेल्स मिळवतो. हे डिटेल्स मिळवल्यानंतर ते याचा वापर युजरच्या परवनागीशिवाय त्यांच्या अकाउंटमध्ये फ्रॉड करण्यासाठी करतात. त्यानंतर युजरला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं.
अधिकतर प्रकरणांत स्कॅमर्स स्वत:ला बँक अधिकारी म्हणून सांगतात आणि माहिती काढतात. त्यानंतर बँक अकाउंट बंद होणं किंवा त्यात बदल करण्याच्या कारणाने बँक डिटेल्स मागतात आणि युजरच्या अकाउंटमधून पैशांची चोरी करतात.
अशा फोन-कॉलवेळी फ्रॉड करणारे युजर्सला सर्वात आधी त्यांचं नाव आणि आडनाव विचारतात. त्यामुळे त्यांचं काम अधिक सोपं होतं. तुम्हालाही कधी असा कॉल आल्यास, फोनवरच बँकिग डिटेल्सची माहिती विचारली गेल्यास, फोनवर कोणतंही उत्तर न देता लगेच बँकेत रिपोर्ट करा.
कोणत्याही बँकेतील अधिकारी, कर्मचारी बँक ग्राहकांना कधीही कॉल करत नाही. तसंच कोणतेही बँकिंग किंवा पर्सनल डिटेल्स ते मागत नाहीत. त्यामुळे तुमची माहिती कधीही कोणालाही देऊ नका.
बँकेकडूनही अशा फ्रॉडबाबत अनेकदा ग्राहकांना सतर्क करण्यात येतं. बँकेकडून कधीही पर्सनल माहिती न देण्याबाबत तसंच कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचं सांगितलं जातं. कोणतीही लिंक क्लिक करुन त्यात डिटेल्स भरु नयेत. बँकेच्या नावाचा फॉर्म लिंकवर आला असल्यास किंवा इतर कोणतीही माहिती भरण्याचं लिंकमध्ये सांगितलं असल्यास अशी माहिती कुठेही भरु नका. ग्राहक कोणत्याही मदतीसाठी आपल्या बँक शाखेत जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Tech news