नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: जगाचे अधिकाधिक व्यवहार वेगाने ऑनलाइन स्वरूपात रूपांतरित होत आहेत. कोरोनाच्या कालखंडात या रूपांतरणाला अधिकच वेग आला. अर्थातच त्याच वेगाने फसवणुकीचं प्रमाणही वाढत चाललं आहे. बँकिंग फ्रॉड (Banking Fraud), सायबर फ्रॉड (Cyber Fraud) आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) नागरिकांना नेटबँकिंग (Netbanking), तसंच मोबाइल बँकिंगचे पासवर्ड्स स्ट्राँग (Strong Password) ठेवण्याचं आवाहन केलं आहे.पासवर्ड स्ट्राँग असण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या वापरल्या तर ऑनलाइन फसवणुकीपासून (Online Fraud) बचाव होऊ शकतो. पासवर्ड स्ट्राँग असेल, तर पैसे आणि स्वतःची माहिती यांची सुरक्षितता वाढवली जाऊ शकते.
स्ट्राँग पासवर्डसाठी :
- पासवर्डमध्ये Uppercase आणि Lowercase अशा दोन्हींचं कॉम्बिनेशन हवं. उदाहरणार्थ aBjsE7uG.
- पासवर्डमध्ये आकडे आणि चिन्हं अशा दोन्हींचाही वापर करावा. उदाहरणार्थ AbjsE7uG61!@
तुमच्या सोबत Online Fraud झालाय? बँक या परिस्थितीत देईल नुकसान भरपाई
- पासवर्डमध्ये कमीत कमी 8 अक्षरं असलीच पाहिजेत. उदाहरणार्थ aBjsE7uG
- itislocked, thisismypassword अशा सहज ओळखता येण्यासारख्या पासवर्ड्सचा वापर करू नये.
- ‘qwerty’ किंवा ‘asdfg’ अशा कीबोर्ड पाथचा वापर पासवर्डसाठी करता कामा नये. “:)”, “:/’आदींचा वापर करू शकता.
- 12345678 किंवा abcdefg असे अगदी कॉमन पासवर्ड्स ठेवू नयेत.
- सहज अंदाज बांधता येऊ शकतो, अशा सबस्टिट्यूशनचा वापर करू नये. उदाहरणार्थ - DOORBELL-DOOR8377
- पासवर्डमध्ये आपलं नाव आणि जन्मतारीख यांचा संयोग असू नये. उदाहरणार्थ Ramesh@1967.
हेल्पलाइन
तुम्ही दुर्दैवाने ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडला असाल, तर 155260 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून तुमची तक्रार दाखल करावी लागेल. केंद्रीय गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) विकसित केलं आहे.
https://cybercrime.gov.in/Default.aspx ही त्याची लिंक आहे. या वेबसाइटवर 155260 हा हेल्पलाइन नंबर (Helpline) देण्यात आला आहे. तो आपल्या फोनच्या काँटॅक्ट्समध्ये सेव्ह करून ठेवावा.
दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातले नागरिक या हेल्पलाइन क्रमांकावर आठवड्याच्या सातही दिवशी कोणत्याही वेळी कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. अन्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खुला असतो. त्या वेळेत तक्रार नोंदवता येऊ शकते.
Corona Caller Tune चा वैताग आलाय? फक्त एका मेसेजने बंद करा तो आवाज
त्याशिवाय सिटिझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टीम हा प्लॅटफॉर्मही नागरिकांना उपयुक्त ठरतो. सुमारे 55 बँका, ई-वॉलेट्स, ई-कॉमर्स साइट्स, पेमेंट गेटवेज आणि अन्य कंपन्यांनी एकत्र येऊन त्याची निर्मिती केली आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना मदत मिळते.