मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! WhatsApp वरुन चोरी होऊ शकतात तुमचे बँक डिटेल्स, असा होतोय Fraud

Alert! WhatsApp वरुन चोरी होऊ शकतात तुमचे बँक डिटेल्स, असा होतोय Fraud

इंटरनेट स्कॅमर्स तुमच्या WhatsApp नंबरवर एक फिशिंग लिंक पाठवतात. या लिंक कंप्यूटरवरही येऊ शकतात. या लिंक एखाद्या माहितीबद्दल किंवा ऑफरबाबत असतात.

इंटरनेट स्कॅमर्स तुमच्या WhatsApp नंबरवर एक फिशिंग लिंक पाठवतात. या लिंक कंप्यूटरवरही येऊ शकतात. या लिंक एखाद्या माहितीबद्दल किंवा ऑफरबाबत असतात.

इंटरनेट स्कॅमर्स तुमच्या WhatsApp नंबरवर एक फिशिंग लिंक पाठवतात. या लिंक कंप्यूटरवरही येऊ शकतात. या लिंक एखाद्या माहितीबद्दल किंवा ऑफरबाबत असतात.

नवी दिल्ली, 8 जानेवारी : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सतत वाढत आहेत. इंटरनेट स्कॅमर्स फ्रॉडसाठी दररोज नव्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यामुळे युजरची छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. काही दिवसांपूर्वी फेक पेटीएमद्वारे फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. कधी KYC च्या नावे, तर कधी एटीएम किंवा क्रेटिड कार्ड अपडेट करण्याच्या नावाने लोकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटवेळी सतर्क राहणं गरजेचं आहे.

मोबाइल-इंटरनेटच्या जगात WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. आता स्कॅमर्स WhatsApp द्वारेच लोकांची फसवणूक करत आहेत. अनेक जण WhatsApp वर आलेले मेसेज, लिंक कोणताही मेसेज न करता ओपन करतात, लिंक असल्यास त्यावर क्लिकही करतात.

पण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं भारी पडू शकतं. अशाप्रकारे लिंकवर क्लिक केल्याने फ्रॉड होण्याचा धोका वाढतो. या लिंकवर क्लिक केल्यानंतर लिंकच्या माध्यमातून तुमची संपूर्ण माहिती स्कॅम करणाऱ्यांपर्यंत पोहोचते.

Online Payment करताना समस्या आली? BHIM, UPI युजर्स अशी करा ऑनलाइन तक्रार

कसा होतो Fraud?

इंटरनेट स्कॅमर्स तुमच्या WhatsApp नंबरवर एक फिशिंग लिंक पाठवतात. या लिंक कंप्यूटरवरही येऊ शकतात. या लिंक एखाद्या माहितीबद्दल किंवा ऑफरबाबत असतात.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात अशा लिंक पाठवल्या जातात. ऑनलाइन शॉपिंग आणि फेस्टिवल ऑफर्सच्या नावाने सणांच्या काळात या लिंक पाठवल्या जातात. लिंकवर क्लिक केल्यानंतर समोर एक नवं पेज ओपन होईल आणि या पेजवर पर्सनल माहिती मागितली जाईल. नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, बँक अकाउंट, पॅन नंबर, आधार नंबर किंवा डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर मागितले जातात.

ज्या लिंकवरुन नवं पेज ओपन होतं, तिथे तुम्ही जी माहिती देता, ती संपूर्ण माहिती हॅकर्सकडे पोहोचते. याद्वारे हॅकर्स बँक अकाउंट अॅक्सेस करतात आणि बँक खात्याचे डिटेल्स जुळल्यास तुमच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करुन घेतली जाते. अनेकदा हॅकर्स तुमची माहिती इतर हॅकर्सला विकतातही.

WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

व्हायरस Apps -

हॅकर्सकडून पाठवण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइल फोन किंवा कंप्यूटर व्हायरस असलेले Apps किंवा फाइल डाउनलोड होतात, जे पर्सनल डिटेल्स हॅक करतात. त्याशिवाय मोबाइल किंवा कंप्यूटरचा डेटा किंवा प्रोग्रामही खराब करतात.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, Rediroff.ru असणाऱ्या URL मध्ये फ्रॉडच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे Rediroff.ru लिहिलेल्या लिंक ओपन करू नका. कोणतेही नवे-नवे Apps डाउनलोड करू नका. मोठ्या ऑफर्स, महागड्या गिफ्ट्सवाल्या लिंकवर क्लिक करू नका. थर्ड पार्टी App डाउनलोड करू नका.

First published:
top videos

    Tags: Online fraud, Tech news, Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user