Home /News /technology /

तुमचा कंप्यूटर स्लो झालाय? या सोप्या पद्धतीने असा होईल सुपरफास्ट

तुमचा कंप्यूटर स्लो झालाय? या सोप्या पद्धतीने असा होईल सुपरफास्ट

कंप्यूटर-लॅपटॉप स्लो झाल्याने मोठी समस्या येते. परंतु काही टिप्सद्वारे कंप्यूटर-लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते.

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सध्या अनेकांचं Work From Home सुरू आहे. घरी काम करताना कंप्यूटर किंवा लॅपटॉप हँग झाल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. कंप्यूटर-लॅपटॉप स्लो झाल्याने मोठी समस्या येते. परंतु काही टिप्सद्वारे कंप्यूटर-लॅपटॉपचा स्पीड वाढवण्यास मदत होऊ शकते. कंप्यूटरचा स्पीड वाढवण्याच्या क्षमतेवर अनेक घटक अवलंबून असतात. यात सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे RAM आहे. जर तुम्हाला कंप्यूटरचा स्पीड वाढवायचा असेल, तर तुम्हाला तुमचं हार्ड ड्राइव्ह खाली करावं लागेल आणि RAM वाढवावा लागेल. त्याशिवाय इतरही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. RAM कसं वाढवाल? कंप्यूटरचा RAM तुमच्या पीसीसाठी शॉर्ट टर्म डेटा सेंसर म्हणून काम करतो. हे अधिक भरलं, तर यामुळे तुमचा कंप्यूटर स्लो होऊ शकतो. अनेक कंप्यूटरमध्ये रॅम अपग्रेड करण्याची प्रक्रिया अधिक कठीण नाही. - कंप्यूटरचा स्पीड वाढवण्यासाठी Start Menu वर टास्क मॅनेजरमध्ये जा. त्यानंतर Ctrl+Shift+Esc बटण क्लिक करा. त्यानंतर जे समोर येईल, त्यावर क्लिक करा. - त्यानंतर मेमरी ओपन होईल. चांगल्या ब्राउजिंग स्पीडसाठी 8GB रॅम पुरेसा ठरतो. सरासरी कंप्यूटर युजर या रॅमसह मल्टी-टास्किंगही करू शकतो. - गेमिंगसाठी स्पीड हवा असल्यास, रॅम अपग्रेड करुन 16GB करू शकता. एवढचं नाही, तर कंप्यूटरच्या क्षमतेनुसार, रॅम 32GB पर्यंत अपग्रेड करता येतो.

  Instagram वर नवा ट्रेंड! कशी अपलोड कराल Drop your best sunset photos स्टोरी

  अधिक रॅम कसा अपग्रेड करता येईल - - नवा रॅम अपग्रेड करण्यासाठी तुमचा कंप्यूटर ओपन करुन, जुनी मेमरी स्टिक काढून त्याऐवजी अधिक मेमरी असणारा रॅम लावावा लागेल. - ही प्रोसेस डेस्कटॉप कंप्यूटरमध्ये सोपी होते. परंतु लॅपटॉपमध्ये असं करणं कठीण होतं. नवा रॅम खरेदी करताना तुमचा कंप्यूटर हे अपग्रेड हँडल करू शकेल का हे पाहणंही गरजेचं आहे. - कंप्यूटरच्या रॅमची क्षमता त्याच्या मदरबोर्डवर अवलंबून असते. त्यासाठी मदरबोर्डची क्षमता लक्षात घेऊन रॅम अपग्रेड करता येईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news

  पुढील बातम्या