नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सरकारी Umang App भारतीय नागरिकांना 265 सरकारी डिपार्टमेंटच्या 21,624 सेवांपर्यंत पोहोचण्याची सुविधा देतं. Umang App 13 भाषांमध्ये असून 17 राज्यात याद्वारे 325 सेवा दिल्या जातात. या App वर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, मेरा राशन यासारख्या सुविधांसह पासपोर्टही बनवता येऊ शकतो. पासपोर्टसंबंधी सर्विसेजचाही उपयोग करता येतो. त्यासाठी फोनमध्ये Umang App डाउनलोड करावं लागेल.
पासपोर्ट बनवण्यासाठी आता पासपोर्ट ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करता येईल. आता पासपोर्ट सेवा Umang App शी जोडण्यात आली आहे, त्यामुळे याद्वारे पासपोर्टसाठी अर्ज करता येईल.
फोनवर कसा कराल Umang App चा वापर -
पासपोर्ट बनवण्यासाठी Google Play Store किंवा iOS स्टोरवरुन उमंग App डाउनलोड करा. इन्स्टॉल झाल्यानंतर App ओपन करा आणि रजिस्ट्रेशन करा. या प्रक्रियेवेळी इथे मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर mPin सेट करावा लागेल. काही सिक्योरिटीसंबंधी प्रश्न-उत्तरं देण्यासह आधार कार्डचे डिटेल्स भरावे लागतील. आधार डिटेल्स स्किपही करता येऊ शकतात. त्याशिवाय Umang App 9718397183 या नंबरवर मिस कॉल करुनही डाउनलोड करता येतं.
- या App वर विविध प्रकारच्या पासपोर्टसाठी कोण-कोणते कागदपत्र लागतील हे तपासता येईल.
- नवीन पासपोर्ट, रिइश्यू, पीसीसी पासपोर्टवर किती चार्ज लागेल याचा हिशोब करता येईल.
- जवळचं पासपोर्ट केंद्र शोधता येतील.
- तुमच्या पासपोर्टसाठीच्या अर्जाचं सध्याचं स्टेटस जाणून घेता येईल.
- अपॉईंटमेंटसाठी सहजपणे उपलब्धतेची चौकशी करता येईल.
Umang App च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून सरकारच्या पासपोर्ट सेवेचा उपयोग करता येईल. घरबसल्या पासपोर्ट बनवण्यासआठी Umang App च्या मदतीने अर्ज करता येतो. त्यानंतर बायोमेट्रिकसाठी पासपोर्ट ऑफिस जावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Government apps, Passport