मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Moto G200 : स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, वाचा जबरदस्त फीचर्स

Moto G200 : स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन, वाचा जबरदस्त फीचर्स

 लवकरच मोटोरोला (Motorola) या कंपनीच्या स्मार्टफोन्सची (Smartphones) चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे. Moto G200 हे त्यातलं महत्त्वाचं मॉडेल आहे.

लवकरच मोटोरोला (Motorola) या कंपनीच्या स्मार्टफोन्सची (Smartphones) चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे. Moto G200 हे त्यातलं महत्त्वाचं मॉडेल आहे.

लवकरच मोटोरोला (Motorola) या कंपनीच्या स्मार्टफोन्सची (Smartphones) चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे. Moto G200 हे त्यातलं महत्त्वाचं मॉडेल आहे.

    मुंबई, 22 नोव्हेंबर : भारत ही स्मार्टफोन्ससाठी बरीच मोठी आणि कंपन्यांच्या दृष्टीने खूप फायद्याची बाजारपेठ आहे. कारण इंटरनेटचा (Internet) प्रसार आणि स्मार्टफोन्सच्या कमी होत असलेल्या किमती यांमळे भारतात स्मार्टफोन्सची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. अगदी नवख्या कंपनीपासून दिग्गज कंपन्यांपर्यंत सर्वच कंपन्या भारतात आपले स्मार्टफोन्स सादर करण्यास उत्सुक असतात. आता लवकरच मोटोरोला (Motorola) या कंपनीच्या स्मार्टफोन्सची (Smartphones) चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर होण्याची शक्यता आहे. Moto G200 हे त्यातलं महत्त्वाचं मॉडेल आहे. हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत यापूर्वीच लाँच झालं असून, या महिन्याच्या अखेरपर्यंत ते भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मोटोरोलाकडून अद्याप याबद्दल अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही; मात्र हा स्मार्टफोन नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत भारतात येण्याच्या वृत्ताला नामवंत टिपस्टर देवयान रॉय यांनी त्याबद्दलची पोस्ट केली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    'स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा एक नवा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होत आहे. नव्या मोटो फोनची भारतातली लाँच डेट 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे,' असं टिपस्टर देवयान रॉय यांनी लिहिलं आहे. त्यांनी स्मार्टफोनच्या मॉडेलचं नाव लिहिलेलं नाही; मात्र मोटो जी 200 हे एकमेव नाव समोर येतं. कारण जागतिक बाजारपेठेत हा फोन अलीकडेच सादर करण्यात आला होता.

    हेही वाचा : एअरटेलच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी, प्रीपेड प्लॅन्सचे दर महागले

    Moto G200 या फोनचे वैशिष्ट्ये :

    Moto G200 या फोनला 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असून, त्याशिवाय 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8K व्हिडिओ, 960 fps स्लो-मोशन व्हिडिओसह व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अन्य काही प्रकारांना सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. या बॅटरीमध्ये 33 W फास्ट चार्जिंगची क्षमता आहे.

    Moto G200 या फोनला 6.8 इंच आकाराचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचा रिफ्रेश रेट 144Hz असा आहे.

    हा स्मार्टफोन (Qualcomm Snapdragon) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888+ SoC या चिपसेटवर चालतो. या फोनला 8GB RAM और 256GB स्टोअरेज देण्यात आलं आहे. या फोनचा अन्य रॅम व्हॅरिएंट उपलब्ध नाही; मात्र 128 जीबी स्टोअरेज क्षमतेचा दुसरा व्हॅरिएंट उपलब्ध आहे.

    हेही वाचा : Google Play Store वर Joker Malware ची एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

    हा फोन 450 युरो अर्थात भारतीय चलनानुसार 37,900 रुपये किमतीला लाँच करण्यात आला होता. तो सध्या लॅटिन अमेरिकेत उपलब्ध आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 35 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. तगडी फीचर्स असलेला हा स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची 30 नोव्हेंबर ही तारीख कधी येते, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

    Moto G71, G51 आणि Moto G31 ही तीन अन्य मॉडेल्सही भारतात किफायतशीर किंमतीत सादर करण्याचं नियोजन मोटोरोला कंपनीकडून केलं जात असल्याची समोर येत आहे.

    First published:
    top videos