मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

10 हजारांहून कमी किमतीत मिळतील हे 5 जबरदस्त Smartphone; पाहा फीचर्स

10 हजारांहून कमी किमतीत मिळतील हे 5 जबरदस्त Smartphone; पाहा फीचर्स

असे काही स्मार्टफोन आहेत, जे कमी किंमतीत चांगले फीचर्स देतात. 10 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोनबद्दल..

असे काही स्मार्टफोन आहेत, जे कमी किंमतीत चांगले फीचर्स देतात. 10 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोनबद्दल..

असे काही स्मार्टफोन आहेत, जे कमी किंमतीत चांगले फीचर्स देतात. 10 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोनबद्दल..

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : भारतासह जगभरात स्मार्टफोनचा वापर वाढत असल्याने विविध स्मार्टफोन कंपन्या चांगल्या फीचर्ससह स्मार्टफोन बाजारात आणत आहे. स्मार्टफोन्स युजर्सच्या दैनंदिन गरजेचा भाग बनला आहे. असे काही स्मार्टफोन आहेत, जे कमी किंमतीत चांगले फीचर्स देतात. 10 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोनबद्दल..

Realme C25 -

या स्मार्टफोनची किंमत 9,999 रूपये असून त्यात 6.5 इंची डिस्प्लेसह 720×1600 पिक्सलचं Screen resolution देण्यात (best 5 Smartphones cost less than 10 thausand with good Features) आलं आहे. त्याचबरोबर 8 Megapixel चा front camera आणि 6000 mAh क्षमतेची बॅटरीही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 Megapixel चा दमदार कॅमेरा देण्यात आला आहे.

BSNL:परवडणाऱ्या किंमतीत 81 दिवसांपर्यंत 1 GB डेटा,अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

Realme Narzo 30A -

रियलमी कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंची डिस्प्ले आणि 6000 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा Rear Camera देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

Motorola Moto E7 Plus  -

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत 8999 रूपये असून त्यात 6.5 इंची डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon 460 SOC चं फीचरही देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा Rear कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात 5000 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

Google Smartphone मध्ये विचित्र गडबड, आपोआप लागतात Calls; हा काय प्रकार आहे...

Micromax In 2b -

Micromax कंपनीने पुन्हा एकदा बाजारात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही दिवसांमध्ये कंपनीनं जबरदस्त फीचर्स असलेले अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आता Micromax In 2b हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून यात 6.25 इंची डिस्प्लेसह, 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

50 MP चा Camera, Redmi पेक्षा कमी किंमत, जबरदस्त फिचर्स असलेला Smartphone लॉन्च!

Jio Phone Next -

Jio कंपनीने बहुचर्चित JioPhone Next लॉन्च केला आहे. या फोनला 5.45-इंची स्क्रिन आणि Anti-fingerprint सह Coating Corning Gorilla Glass देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा Snapper आणि 8MP Shooter कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 4G Dual-SIM ही यात वापरता येणार आहे. JioPhone Next ला ग्राहकांना 6,499 रूपयांमध्ये खरेदी करत येईल.

First published:

Tags: Realme, Reliance Jio, Smartphones