मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

50 MP चा Camera, Redmi पेक्षा कमी किंमत, जबरदस्त फिचर्स असलेला Smartphone लॉन्च!

50 MP चा Camera, Redmi पेक्षा कमी किंमत, जबरदस्त फिचर्स असलेला Smartphone लॉन्च!

गेल्या ऑक्टोबर महिन्यात Infinix ने नवा स्मार्टफोन Infinix Note 11 Pro लाँच केला होता. यानंतर लगेचच व्हॅनिला Infinix नोट 11 बाजारात दाखल झाला. यातच कंपनीने याच सीरिजमधला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे.

मुंबई, 9 नोव्हेंबर : सध्या एकापेक्षा एक नवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतात. गेल्या ऑक्टोबर महिन्यात Infinix ने नवा स्मार्टफोन Infinix Note 11 Pro लाँच केला होता. यानंतर लगेचच व्हॅनिला Infinix नोट 11 बाजारात दाखल झाला. यातच कंपनीने याच सीरिजमधला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Infinix Note 11S आहे. या फोनमधील फीर्चस पाहिल्यानंतर हा रेडमी स्मार्टफोनला टक्कर देणार असल्याचे दिसत आहे.

Infinix Note 11s मध्ये समोर 6.95 इंच फुल IPS LCD स्क्रीन आहे. स्क्रीन 120 Hz रिफ्रेश रेटसह फुल HD+ रिझोल्युशनची आहे. डिव्हाइसच्या मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सल तर दुसरा 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 1 क्वाड-एलईडी फ्लॅश (quad-LED flash) देखील आहे. फोटो काढण्यासाठी हा अगदी उत्तम कॅमेरा आहे.

Note 11s मध्ये डिव्हाइसमध्ये Helio G96 चिपसेट आहे. या फोनचे व्हेरियंट 3GB, 4GB, 6GB आणि 8GB रॅममध्ये उपलब्ध आहेत. हा LPDDR4x रॅम आहे. स्टोरेजसाठी स्मार्टफोन्समध्ये 64GB किंवा 128GB चा पर्याय देण्यात आला आहे. तसेच डिव्हाइसमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आलेला आहे.

33 वॉट फास्ट चार्जिंग

Note 11s मध्ये डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी मिळणार आहे. फोन 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येणार आहे. या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, सुरक्षेसाठी यात साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस लॉक आहे. तर XOS, Dual 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, DTS ऑडिओवर चालणारे ड्युअल स्पीकर, एक लीनिअर मोटर, उष्णता नियंत्रित करण्यासाठी 3D ग्राफेन फिल्म, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक सुद्धा आहे. फीर्चस पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा फोन जवळपास Note 11 Pro ची कॉपी आहे. फक्त दोन्ही स्मार्टफोनमधील मागील कॅमेरा सेटअपमध्ये फरक दिसून येतो.

Infinix Note 11S किंमत

Infinix Note 11S मोबाईल तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. हेज ग्रीन (Haze Green), मिथ्रिल ग्रे (Mithril Gray) आणि सिंफनी स्यान (Symphony Cyan) असे तीन रंग उपलब्ध आहेत. थायलंडमध्ये 6,999 थाई बाटमध्ये (थायलंडमधील चलन) हा फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत भारतीय चलनात सुमारे 15,700 रुपये आहे. या डिव्हाइसचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले हे आहे. Infinix Note 11S मध्ये 6.95 इंचांचा मोठा डिस्प्ले आहे, जो आजकाल खूप कमी स्मार्टफोनमध्ये दिसतो. कमी किंमतीमध्ये तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.

First published: