जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या

सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या

सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या

नवी गाडी खरेदी करायची नसेल, तर सेकंड हँड कारचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. परंतु जुनी गाडी खरेदी करताना विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मे : कोरोना काळात (Corona) सुरक्षेच्या दृष्टीने अनेकांचं कारमधून प्रवास करण्याला प्राधान्य असल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाउननंतर (lockdown) काही दिवसांत कार खरेदीची मागणीही वाढली होती. नव्याच नाही, तर सेकंड हँड कार (Second hand car) खरेदीसाठीही मोठी मागणी होती. नवी गाडी खरेदी करायची नसेल, तर सेकंड हँड कारचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. परंतु जुनी गाडी खरेदी करताना विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारच्या मॉडेलचं पूर्ण नाव - हरियाणातील मुनिंदर सिंह यांनी आपली स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कार विकली. त्यानंतर त्यांची ही गाडी एका व्यक्तीने संपूर्ण कागदपत्र पाहून विकत घेतली. परंतु रजिस्ट्रेशन कार्डमध्ये (RC) एक गोष्ट पाहिली नाही आणि पुढे अनेक समस्या आल्या. रजिस्ट्रेशन कार्डवर कारचं संपूर्ण नाव नव्हतं, केवळ स्विफ्ट एलएक्सआय असं लिहिलं होतं. त्याऐवजी स्विफ्ट डिजायर एलएक्सआय असं असणं गरजेचं होतं. ही कार खरेदी करणाऱ्याला त्यावेळी समस्या आली, जेव्हा तो कार आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी एनओसी काढण्यासाठी गेला. त्यावेळी एनओसीमध्ये केवळ स्विफ्ट लिहिलेलं दिसत होतं, परंतु गाडीचं पूर्ण नाव असणं गरजेचं होतं.

(वाचा -  COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका )

इनवॉईस - आरटीओने (RTO), ही आधीच्या आरटीओची चूक असल्याचं सांगितलं, ज्यात आता ते काहीही करू शकत नाही, असं सांगण्यात आलं. आरटीओने कारचं इनवॉईस मिळाल्यास हे चेंज होऊ शकतं असं सांगितलं. त्या व्यक्तीने कारचं इनवॉईस कसंतरी काढलं, कारण कार थर्ड ओनरची होती. त्याने ज्या व्यक्तीकडून ही कार खरेदी केली होती, त्यालाही याबाबत माहिती नव्हती. इनवॉईस तर मिळालं, परंतु तरीही काम होणार नसल्याचं सांगण्यात आलं, कारण सिस्टमवर एकदा जे नाव जातं, ते पुन्हा बदलणं कठीण असतं.

(वाचा -  केंद्राचा मोठा निर्णय; Oxygen कंटेनरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाईस लावणं अनिवार्य )

अशी सेकंड हँड करा अजिबात खरेदी करू नका - कार एक्सपर्टनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारच्या RC मध्ये कारचं पूर्ण नाव नसेल, अशी सेकंड हँड कार खरेदी करू नका. कारण अशी कार पुढे विक्री करताना अनेक समस्या येऊ शकतात. अनेकदा लोक लोनवर कार खरेदी करतात. अशात आरसीवर कारचं पूर्ण नाव किंवा योग्य नाव नसेल, तर लोन मिळण्यासही समस्या येऊ शकते. जर एखादी नवी कोरी कार खरेदी करत असाल, तरीही आरटीओने कारचं पूर्ण आणि योग्य नाव लिहिलं आहे ना ते तपासा. अन्यथा पुढे हे नाव बदलणं मोठी समस्या ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: car , RTO
  • First Published :
जाहिरात
जाहिरात