नवी दिल्ली, 4 मे : देशात कोरोना व्हायरसचा विस्फोट होत असताना, ऑक्सिजनची कमतरता (shortage of Oxygen) आणि पुरवठ्यात होणारा उशीर पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Container), टँकर आणि वाहनांमध्ये व्हिकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसवणं अनिवार्य केलं आहे. जीपीएस ट्रॅकिंग या टँकरची योग्य देखरेख आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. याशिवाय कुठे डायवर्जन किंवा उशीर होत नाही ना, हेदेखील या ट्रॅकरमुळे समजेल. मंत्रालयाने एक ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ‘MoRTH ने ऑक्सिजन कंटेनर, टँकर, वाहनांमध्ये व्हिकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. GPS ट्रॅकिंग या टँकर्सची निगरानी आणि सुरक्षा सुनिश्चित करेल.’
#DrivingGrowth#Unite2FightCorona pic.twitter.com/j5nDZbiV0q
— MORTHINDIA (@MORTHIndia) May 4, 2021
ऑक्सिजनच्या कमतरतेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारलं - दिल्ली हायकोर्टात ऑक्सिजनच्या कमतरेबाबत मंगळवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने यावरुन केंद्राला फटकारलं आहे. ‘देशात जी स्थिती आहे, ती पाहता तुम्ही आंधळे होऊ शकता, आम्ही नाही. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही.’, असं भाषेत कोर्टाने केंद्राला सुनावलं आहे.
(वाचा - Lockdown काळात बाहेर जाण्याची गरज नाही; घरबसल्या बनवा Driving License )
‘केंद्राने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. आम्ही असं करू शकत नाही. जर महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनची कमतरता असेल, तर काही टँकर दिल्लीला पाठवता येतील.’, असंही कोर्टाने सांगितलं. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आज कोरोना केसेसमध्ये काहीशी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,57,229 नवे रुग्ण आढळले असून 3,449 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात 3,20,289 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत.