मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

सावधान! COVID-19 लस नोंदणीचा हा SMS फेक, लसीकरणासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका

हा एसएमएस प्रामुख्याने मेसेजेस अ‍ॅपद्वारे अँड्रॉइड वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्यक्षात या मेसेजमधील लिंक कॉम्प्युटरला हॅक करण्यासाठी, बंद पाडण्यासाठी, कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील डेटा चोरण्यासाठी, अनधिकृतरीत्या वापरण्यासाठी बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमशी जोडणारी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 6 मे: 18 वर्षांवरील प्रत्येकासाठी कोविड - 19 लसीकरण (Corona Vaccine) मोहीम भारतात सुरू झाली आहे. परंतु, अनेकांना लसींच्या कमतरतेमुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या आसपास लसीकरणासाठी उपलब्ध स्लॉट्स शोधण्यात मदत करण्यासाठी कोविन एपीआयचा (CoWIN API) भारतात कोविड-19 च्या लसीकरणासाठी अधिकृत नोंदणी मंच वापर करण्यात येणारे अनेक प्लॅटफॉर्म्सही तयार केले गेले आहेत.

सध्या इंटरनेटवर एक मेसेज फिरत आहे, ज्यात एक नवीन अ‍ॅप डाउनलोड करून कोविड-19 लसीसाठी नोंदणी करण्याचा सोपा उपाय असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा SMS प्रामुख्याने मेसेजेस अ‍ॅपद्वारे अँड्रॉइड वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्यक्षात या मेसेजमधील लिंक कॉम्प्युटरला हॅक करण्यासाठी, बंद पाडण्यासाठी, कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील डेटा चोरण्यासाठी, अनधिकृतरीत्या वापरण्यासाठी बनवण्यात आलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅमशी जोडणारी आहे.

ही मालवेयर लिंक पहिल्यांदा लुकास स्टेफानो आणि मालवेअर हंटर टीमच्या संशोधकांनी शोधली होती. या संशोधकांनी ही बाब ट्विटरवरून शेअर केली आहे.

हे वाचा - मराठी मालिकांना कोरोनाचा फटका; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

स्टीफॅन्कोच्या मते, भारतीय वापरकर्त्यांना लक्ष्य करून तयार करण्यात आलेल्या या मेसेजमध्ये 'कोविड-19 अ‍ॅप वापरून लसीसाठी नोंदणी करणं’ असा मजकूर या लिंकमध्ये आहे. हा बनावट संदेश मुख्यत: अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, आयओएस वापरकर्त्यांना हा संदेश पोहोचत नसल्याचं दिसत आहे.

एखाद्या वापरकर्त्याने हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर या बनावट प्लॅटफॉर्मद्वारे विनामूल्य नोंदणीचं आश्वासन दिलं जातं. कॉन्टॅक्टस आणि इतर वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश करण्याची परवानगीदेखील मागितली आहे. विशेष म्हणजे हे मालवेयरने भरलेलं अ‍ॅप अगदी लसीकरण नोंदणी अ‍ॅपसारखंच वाटतं. डिव्हाईसवर उपलब्ध असलेल्या पहिल्या उपलब्ध ऑपरेटरचा वापर करून हे मालवेयर पसरवण्यासाठी अ‍ॅपला ड्युअल-सिम कनेक्टिव्हिटी सपोर्ट असल्याचं आढळलं आहे.

हे वाचा - सलमान खानचा मोठा निर्णय; ‘राधे’ची कमाई खर्च करणार कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी

असे कोणतेही मेसेज, SMS आल्यास अँड्रॉइड वापरकर्त्यांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा डिलिट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक कोविड-19 लसीसाठी कोविन वेबसाईट, कोविन अँड्रॉइड अ‍ॅप आणि आरोग्य सेतुद्वारेच नोंदणी करू शकतात. बर्‍याच कंपन्या आणि संशोधकांनी नागरिकांना त्यांच्या रहिवासी ठिकाणाजवळ उपलब्ध लसीचे स्लॉट माहिती करून घेण्यात मदत करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या वेबसाइटसदेखील तयार केल्या आहेत. परंतु, ते बुकिंगची सुविधा देत नाहीत.

अलीकडेच कोविनचे ​​प्रमुख आरएस शर्मा यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अन्य प्लॅटफॉर्मवर एपीआय उघडणं धोकादायक ठरत नाही. कारण, नोंदणीसाठी ओटीपी असणं आवश्यक आहे, जो फक्त कोविन प्लॅटफॉर्मद्वारे तयार केला गेलेला असतो.

First published:

Tags: Corona spread, Corona vaccination, Coronavirus, Fake, SMS, Tech news, Technology