• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Battlegrounds Mobile India गेम खेळताय? कंपनीने सांगितले नियम, एक चूक पडू शकते भारी

Battlegrounds Mobile India गेम खेळताय? कंपनीने सांगितले नियम, एक चूक पडू शकते भारी

कोणताही प्लेयर गेम खेळताना कोणत्याही प्रकारची चीटिंग आणि नियमांचं उल्लंघन करत असेल, तर त्याच्या इन-गेम अकाउंटविरोधात कारवाई केली जाईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जून : Battlegrounds Mobile India चं (BGMI) बीटा वर्जन आता सर्वांसाठी रोलआउट करण्यात आलं आहे. कोणीही Google Play Store वरुन डाउनलोड करू शकतो. कंपनीने याची घोषणा सोशल मीडियावर पोस्टद्वारे केली आहे. गेम रोलआउट करण्यासह गेमसंबंधी नियमही कंपनीने जारी केले आहेत. कंपनीच्या अधिकृत साईटवर Krafton ने गेमशी संबंधित नियम आणि कोड्स ऑफ कंडक्टसह बॅनबाबत माहितीही शेअर केली आहे. कोणताही प्लेयर गेम खेळताना कोणत्याही प्रकारची चीटिंग आणि नियमांचं उल्लंघन करत असेल, तर त्याच्या इन-गेम अकाउंटविरोधात कारवाई केली जाईल. Battlegrounds Mobile India चे नियम - - कोणत्याही अनऑथोराईज्ड प्रोग्राम आणि हार्डवेअर डिव्हाईसचा वापर करू नये. - गेम क्लायंट, सर्वर आणि गेम डेटाशी कोणतीही छेडछाड करू नये. - गेमच्या Bugs आणि ग्लिचचा गैरवापर करू नये. - एकमेकांविरोधात कोणताही भेदभाव करू नये. - कोणत्याही प्लेयरला स्टॉक करू नये. - कोणत्याही प्लेयरचं युजर अकाउंट चोरी करू नये. - अकाउंट विकू नये. - प्रोफाईलवर आक्षेपार्ह फोटो लावणं, एखाद्याच्या पर्सनल फोटोचा वापर करणं, अफवा पसरवणं, दुसऱ्या युजरच्या अकाउंटचा चुकीचा वापर करणं, लिंग-जातीयता-राष्ट्रीयत्वावरुन चुकीचं विधान करणंदेखील नियमांविरोधात आहे.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस)

  अशाप्रकारे नियमांची लिस्ट कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे. Battlegrounds Mobile India साठी जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन न केल्यास प्लेयर्सविरोधात कारवाई केली जाऊ शकते. अशा युजर्सचं अकाउंट काही वेळासाठी सस्पेंड केलं जाऊ शकतं. जर प्लेयरने नियमांत न बसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या असल्यास, त्याचं अकाउंट कायमस्वरुपीही बॅन केलं जाऊ शकतं.
  Published by:Karishma
  First published: