नवी दिल्ली, 28 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात कहर सुरू आहे. त्यामुळे अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी घरात राहणंचं सर्वात सुरक्षित आहे. कोरोना काळात एकीकडे ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली असताना, दुसरीकडे ऑनलाईन बँकिंग फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.
सर्वच गोष्टी डिजीटली होत असताना, याचा धोकाही वाढताना दिसतो आहे. अनेक लोक कोरोनामुळे बँकिंग, इतर अनेक पैशांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करतात. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहणं, सावधगिरी बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे. याबाबत SBIनेही आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
QR कोडने पेमेंट करताना SBI चा अलर्ट -
SBI ने फ्रॉडपासून वाचण्यासाठी आपल्या ग्राहकांना QR कोड स्कॅनबाबत अलर्ट केलं आहे. कोणत्याही व्यक्तीने पाठवलेला QR कोड स्कॅन करू नये. यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असून, एका चुकीमुळे अकाउंट खाली होऊ शकतं. हेच सांगण्यासाठी SBI ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अशा क्यूआर कोड स्कॅनमुळे आतापर्यंत अनेकांना या फ्रॉडचा फटका बसला आहे.
You don’t receive money when you scan a QR code. All you get is a message that your bank account is debited for an ‘X’ amount. Do not scan #QRCodes shared by anyone unless the objective is to pay. Stay alert. #StaySafe. https://t.co/EXGQB7YFT9#QRCodes #InternetBanking
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 27, 2021
ATM मधून QR कोडद्वारे काढता येतात पैसे -
एसबीआयने विना डेबिट कार्डदेखील ATM मधून पैसे काढण्याच्या सुविधेची सुरुवात केली आहे. यासाठी फोनमध्ये YONO App असणं आवश्यक आहे.
- ATM मध्ये QR कोड स्कॅन हा पर्याय असेल, त्यावर क्लिक करावं लागेल.
- YONO App ने कोड स्कॅन करावा लागेल, कॅश अमाउंट टाकल्यानंतर एंटर करा.
- यामुळे कोणत्याही OTP ची गरज लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, QR code payment, Sbi alert, Sbi ATM, Tech news, Technology