• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • ..अन्यथा 19 ऑक्टोबरनंतर अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा

..अन्यथा 19 ऑक्टोबरनंतर अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा

15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत, विना HSRP (High Security Registration Plates) वाहनांना आरटीओमध्ये (RTO) होणाऱ्या कामांसाठी मनाईचे आदेश दिले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : कोणत्याही वाहनाला हाय सिक्योरिटी नंबर प्लेट (High Security Number Plate) नसल्यास त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यास आतापर्यंत बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करत, विना HSRP (High Security Registration Plates) वाहनांना आरटीओमध्ये (RTO) होणाऱ्या काही कामांसाठी मनाईचे आदेश दिले आहेत. HSRP एक होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि Chassis नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता तयार करण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाशी जोडली जाते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.

  वाचा - केवळ 57,560 रुपयात खरेदी करा Heroची 'ही' बाईक, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

  19 ऑक्टोबरनंतर या कामांवर बंदी - - विना HSRP वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकेंड कॉपी - वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर - ऍड्रेस चेंज - रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन - नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट - RTO Hypothecation cancellation - Hypothecation endorsement - नवीन परमिट - टेम्प्ररी परमिट - स्पेशल परमिट - नॅशनल परमिट इत्यादी कामं करता येणार नाहीत.

  वाचा - आता चोरी होणार नाही तुमची कार; 'हे' हायटेक लॉक होणार गार्ड

  कसा कराल ऑनलाईन अर्ज - हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोड स्टिकर लावण्याची प्रक्रिया आता सहज झाली आहे. High Security Registration Plates लावण्यासाठी दोन पोर्टल तयार करण्यात आले आहेत. यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंत काही माहिती द्यावी लागेल.

  वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

  गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: