आता चोरी होणार नाही तुमची कार; 'हे' हायटेक लॉक होणार गार्ड

आता चोरी होणार नाही तुमची कार; 'हे' हायटेक लॉक होणार गार्ड

कार सेफ्टीसाठीचं हे लॉक आकाराने लहान असून वापरायलाही सोपं आहे. सेफ्टी लॉकच्या मदतीने कार अनेक पटींनी सिक्योर होण्यास मदत होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : देशात आता हायटेक कार आल्या असून त्या ऍपच्या मदतीने ऑपरेट केल्या जाऊ शकतात. त्याशिवाय या कारमध्ये चोरांपासून वाचण्यासाठी हायटेक सिक्योरिटी फीचरही मिळतात. लाखोंमध्ये खरेदी केलेल्या कारला सिक्योर करण्यासाठी सेफ्टी वाढवणं गरजेचं आहे. सेफ्टी लॉकच्या मदतीने कार अनेक पटींनी सिक्योर होण्यास मदत होऊ शकते.

गियर लॉक -

कारच्या सेफ्टीसाठी गियर लॉक (Car Gear Lock) महत्त्वाचं ठरतं. या लॉकचा आकार अतिशय छोटा असतो आणि हे याचा वापर करणंही सोपं आहे. गियर लॉक मजबूत असून ते सहजपणे तोडलं किंवा कापलं जाऊ शकत नाही. गियर लॉक मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पद्धतीने काम करतं.

हे वाचा - आता गाडी चोरी होण्याची नाही भीती, फक्त 799 रुपयांत सुरक्षित करा बाइक आणि स्कूटर!

बाजारात या लॉकचं संपूर्ण किट उपलब्ध आहे. जे गियर बॉक्सवर फिट केलं जातं. किटमध्ये एक हँडल दिलेलं असतं, जे गियरमध्ये अडकवून किटसोबत लॉक केलं जातं. अशावेळी एखाद्या चोराने कारचा दरवाजा उघडून गाडी स्टार्ट केली तरीही गियरशिवाय गाडी पुढे घेऊन जाता येणार नाही.

हे वाचा - ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक

गियर लॉक किंमत -

गियर लॉकची ऑनलाईन किंमत 299 रुपयांपासून सुरू होते. जे क्वालिटीनुसार, 3 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतं.

हे वाचा - Paytm मधून पैसे कट, पण ट्रान्झेक्शन फेल; डोंट वरी असे मिळतील संपूर्ण पैसे

Published by: Karishma Bhurke
First published: October 17, 2020, 5:37 PM IST
Tags: car

ताज्या बातम्या