नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. चारचाकी वाहनांबरोबरच अनेक दुचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांची निमिर्ती करण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती करणाऱ्या हिरो इलेक्ट्रिकने (Hero electric)आपल्या नवीन इलेक्ट्रिक गाड्यांची घोषणा केली आहे. खास शहरी भागांसाठी या गाड्यांची निर्मिती करण्यात आली असून याला City Speed असं नाव देण्यात आलं आहे.
इतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत ही गाडी मजबूत आणि जास्त स्पीड असणारी आहे. शहरी भागातील फ्लायओव्हर आणि स्लोपवरही या गाड्या चांगल्या चालतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. या नवीन इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये Optima-hx, Nyx-hx, आणि Photon-hx हे तीन व्हेरिएन्ट मिळणार आहेत.
जगातील सर्वात हलका आणि पातळ 5G iPhone; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
हिरो इलेक्ट्रिक इंडियाचे सीईओ सोहिन्दर गिल यांनी सांगितलं की, सध्या भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये, कमी वेगाने धावू शकणाऱ्या गाड्या आहेत. आम्ही अनेक वर्षांच्या संशोधनानंतर उत्तम गाडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम स्पीडबरोबरच चांगला पिकअप आणि शहरांमधील रस्त्यावर उत्तमप्रकारे चालू शकणारी वाहनं आम्ही तयार केली आहेत. भारतातील 25 शहरांमध्ये असणाऱ्या 500 डिलरशिपमध्ये या नवीन इलेक्ट्रिक गाड्या मिळणार आहेत. या गाड्यांवर सबसिडीदेखील मिळणार असून दिल्लीमध्ये सरकार या गाड्या खरेदी करणाऱ्या नागरिकांना सबसिडीदेखील उपलब्ध करून देणार आहे.
या गाड्यांच्या किंमती :
या गाड्या स्वस्त किंमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचा कंपनीचा दावा आहे. 57,560 रुपयांपासून या गाड्यांच्या किंमत सुरु होत आहे. यामध्ये पॉवरफुल बॅटरी असून, एकदा चार्ज केल्यानंतर 70 किमी ते 200 किमी पर्यंत ही गाडी प्रवास करू शकणार आहे.
सहा महिन्यांनंतर सुरू होत आहेत सिनेमागृहं, Paytm कडून मिळतील या खास सुविधा
त्याचबरोबर बॅटरी लाईफही जास्त असून यासाठी सतत खर्च देखील करावा लागणार नाही. जागतिक पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभर इलेक्ट्रिक गाड्यांचं प्रमाण वाढत आहे. स्वच्छ पर्यावरणासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरणं अनिवार्य झालं असून, किमान जवळच्या अंतरावर जाणाऱ्या लोकांनी जरी इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या तरीही प्रदूषण कमी होऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.