वॉशिंग्टन, 25 ऑगस्ट : अमेरिकेत चोरट्यांनी एका व्यक्तीचा पाठलाग करण्यासाठी Apple वॉचचा उपयोग करुन चोरी केल्याचं समोर आलं आहे. अॅपल वॉचचा उपयोग करुन त्यांनी एका व्यक्तीचे 500,000 डॉलर म्हणजे जवळपास 3.71 कोटी रुपये कॅश लुटली.
लूट नेमकी झाली कशी?
ज्यावेळी अॅपलने या वर्षाच्या सुरुवातीला आपले एयरटॅग्स लाँच केले, त्यावेळी कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, चिंता व्यक्त करण्यात आली होती, की ब्लूटूथ लोकेशन टॅग्सचा वापर लोकांचा पाठलाग करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो.
अमेरिकेत चोरट्यांनी याचाच वापर केला. 500,000 डॉलर जवळपास 3.71 कोटी लुटण्याआधी त्यांनी अॅपल वॉचचा वापर करुन आपलं लक्ष्य ट्रॅक करण्यात यश मिळवलं. त्यांनी त्या व्यक्तीची आधी संपूर्ण ओळख केली. तो व्यक्ती ड्रग्सचा व्यवसाय करत असल्याचं त्यांना समजलं. चोरट्यांनी हॉटेलच्या रुमची चावी चोरुन त्यानंतर पाच लाख डॉलरची रक्कम घेऊन फरार झाले. चोरांनी त्या व्यक्तीच्या कारच्या बंपरखाली एक Apple Watch लपवलं होतं, ज्याद्वारे त्याला ट्रॅक केलं जात होतं.
7 लोकांच्या या चोरट्यांच्या गँगने अॅपल वॉच खरेदी करुन ते आपल्या AT&T अकाउंटशी लिंक केलं. त्यानंतर चोरट्यांनी वॉच त्या व्यक्तीच्या गाडीखाली ठेवलं. हे डिव्हाईस अतिशय हलकं आणि लहान असल्याने कोणालाही संशय येणार नसल्याने त्यांनी ही आयडिया वापरली. अॅपल वॉच कार बंपरखाली ठेवल्यानंतर त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. त्या व्यक्तीच्या हॉटेलच्या रुममध्ये जावून पुढे 500,000 डॉलर कॅश लुटली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, Smartwatch, Tech news