नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : आपलं मोठं घर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. यासाठी अनेक लोक लाखो रुपये खर्चही करतात. पण एक असा व्यक्ती आहे, ज्याने केवळ 1 लाख रुपये खर्च करुन चालतं-फिरतं अलिशान घर बनवलं आहे. या घराबाबत ज्यावेळी आनंद महिंद्रा यांना समजलं त्यावेळी त्यांनीदेखील या अनोख्या घराचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर या व्यक्तीचं कौतुकच केलं नाही, तर महिंद्रा पिकअप आणि बोलेरोला अशाप्रकारे अलिशान घरात बदलण्याचं आमंत्रणही त्या व्यक्तीला दिलं आहे.
चेन्नईतील अरुण प्रभु नावाच्या एका व्यक्तीने आपल्या ऑटोमध्ये अलिशान घर बनवलं आहे. ज्यात गरजेच्या सर्व सुविधा आहेत. या घरात मोठी जागा असून व्हेंटिलेशनचीही चांगली सोय आहे. यात अरुणने खिडक्या आणि दरवाजे केले असून छतावर कपडे सुकवण्याची व्यवस्थाही केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अरुणच्या या कलाकारीचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत, अरुणने याद्वारे कमी जागेची ताकद दाखवली आहे. जी कोरोनानंतर फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक मोठा ट्रेंड ठरू शकतो. त्यांनी अरुणला बोलेरो पिकअप टॉपवर असं काही करता आलं तर त्यांना आनंद होईल असंही ते म्हणाले. त्याशिवाय त्यांनी लोकांना अरुणशी संपर्क करण्याचंही सांगितलं आहे.
Apparently Arun did this to demonstrate the power of small spaces. But he was also on to a larger trend: a potential post-pandemic wanderlust & desire to be ‘always mobile.’ I’d like to ask if he’ll design an even more ambitious space atop a Bolero pickup. Can someone connect us? https://t.co/5459FtzVrZ
— anand mahindra (@anandmahindra) February 27, 2021
अरुण प्रभुने केवळ एख लाखात हे घर बनवलं आहे. तसंच उर्जेची गरज भागवण्यासाठी अरुणने यात सोलर पॅनलही लावले आहेत. तसंच या घरात पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे.