मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /म्हणून iPhone पेक्षा अँड्रॉइड बरा, Bill gates यांनी सांगितलं कारण

म्हणून iPhone पेक्षा अँड्रॉइड बरा, Bill gates यांनी सांगितलं कारण

बिल गेट्स यांनी नुकतंच एका क्लबहाउसमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. बिल गेट्स यांनी ते आयफोन नाही, तर अँड्रॉईड वापरणं अधिक पसंत करत असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : संपूर्ण जगात iPhone कडे एक स्टेटस सिंबल म्हणून पाहिलं जातं. जवळपास 10 कोटी लोक iPhone चा वापर करतात. iPhone वापरणाऱ्यांमध्ये अनेक मोठ-मोठ्या लोकांचाही समावेश आहे. परंतु मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आयफोन वापरत नाहीत. बिल गेट्स यांनी नुकतंच एका क्लबहाउसमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. बिल गेट्स यांनी ते आयफोन नाही, तर अँड्रॉईड वापरणं अधिक पसंत करत असल्याचं सांगितलं.

'मला प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवायची असल्याने, आयफोनऐवजी अँड्रॉईडचा वापर करणं अधिक पसंत आहे. माझ्याकडे आयफोनही आहे, परंतु मला अँड्रॉईड फोन सोबत ठेवणं अधिक आवडत' असल्याचं ते म्हणाले.

बिल गेट्स पुढे म्हणाले की, 'काही अँड्रॉईड मॅन्युफॅक्चरर मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट्सला अँड्रॉईडमध्ये प्री-इनस्टॉल ठेवतात, त्यामुळे गोष्टी सोप्या होतात. iPhone ला कस्टमाईज करणं अँड्रॉईडप्रमाणे सोपं नाही. अँड्रॉईड फोन अधिक फ्लेक्सिबल आहे. तसंच अँड्रॉईड फोन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या सॉफ्टवेअर अँड्रॉईड ऑपरेटिंगसह सहजपणे कनेक्ट होतात. त्यामुळेच अँड्रॉईड फोन वापरणं अधिक पसंत असल्याचं' त्यांनी सांगितलं.

(वाचा - Three Idiots च्या वांगडू'ने सैनिकांसाठी तयार केलेत खास तंबू : पाहा 10 वैशिष्ट्यं)

Clubhouse इंटरव्ह्यूमध्ये केला खुलासा -

बिल गेट्स यांनी सोशल मीडिया अ‍ॅप क्लबहाउसवर एक इंटरव्ह्यू दिला, जो केवळ iPhone वरच उपलब्ध आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईडवर उपलब्ध नाही. केवळ आयफोनवर उपलब्ध असलेल्या या अ‍ॅपनंतर कंपनी आता याच्या अँड्रॉईड व्हर्जनवरही काम करत आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी या अ‍ॅपवर इंटरव्ह्यू दिल्यानंतर हे अ‍ॅप चर्चेत आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Android, Bill gates, Iphone