जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्यावर कुणाची नजर तर नाही ना? आता Apple च्या या फीचरमधून मिळणार ALERT

तुमच्यावर कुणाची नजर तर नाही ना? आता Apple च्या या फीचरमधून मिळणार ALERT

तुमच्यावर कुणाची नजर तर नाही ना? आता Apple च्या या फीचरमधून मिळणार ALERT

आयओएसने (iOS) 14.4 मधील अपडेटमध्ये युजर्सची प्रायव्हसी अधिक मजबूत करत नवीन फीचर समाविष्ट केलं असून, त्याला ट्रॅकिंग असं नाव देण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 9 मार्च : अ‍ॅपल फोन्स (Apple Phones) हे युझर फ्रेंडली आणि सुरक्षेसाठी उपयुक्त समजले जातात. नुकतीच आयओएसने (iOS) 14.4 मधील अपडेटमध्ये युजर्सची प्रायव्हसी अधिक मजबूत करत नवीन फीचर समाविष्ट केलं असून, त्याला ट्रॅकिंग असं नाव देण्यात आलं आहे. या फीचरचा कंट्रोल युजरच्या हातात असणार आहे. त्यानुसार युजर ज्यांची निवड करेल त्याच व्यक्ती युजरचं ऑनलाइन ट्रॅकिंग (Tracking) करू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच आयओएस 14.5 Beta 3 या डिझाईनमध्ये अ‍ॅपल नव्या फीचरचं टेस्टिंग करत असून, या फीचरमुळे जर कोणी युजरला Stalk  करत असेल, तर तसा अलर्ट युजरला मिळणार आहे. iOS च्या या नव्या फीचरबाबत बेंजामिन मायो म्हणाले की, हे फीचर Item Safety सेटिंग Find My App या माध्यमातून (जर हे एनेबल असेल तर) जर कुणी त्याचा पाठलाग करत असेल, तर युजरला अलर्ट मिळेल. जर हे एनेबल केलेलं नसेल, तर कोणीही अनोळखी युजरचं लोकेशन (Location) पाहू शकेल, पण युजरला त्या व्यक्तीचं लोकेशन दिसणार नाही. तसंच जर युजरच्या आसपास कोणत्याही हालचाली सुरू असतील तर त्याबाबत युजरला नोटिफिकेशन मिळणार नाही.

    (वाचा -  Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर लगाम लागणार; सरकारचा मोठा प्लॅन )

    अ‍ॅपल या अलर्टला मायो नोटसवर पाठवेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे डिफॉल्ट युजरच्या सेटिंगवर राहील पण त्याला मॅन्युअली डिसेबल करावं लागेल. कोणत्याही प्रकारे युजर्सचं ट्रॅकिंग सुरू असेल आणि त्याबाबत युजरला माहिती मिळाली, तर ही माहिती कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना म्हणजे पोलिसांना द्यावी लागेल. अशा स्थितीत युजर आपल्या फोनमधील बॅटरी काढून ठेवू शकेल, यामुळे संबंधित ट्रॅकर युजर्सचं लोकेशन ट्रॅक करु शकणार नाही. आयफोन अनलॉक करण्यासाठी फेसमास्क काढण्याची गरज नाही तसंच, अ‍ॅपल (Apple) लवकरच आयफोन (iPhone) अनलॉक (Unlock) करण्यासाठी फेस आयडीसोबत (Face id) एक नवा पर्याय आणत आहे. यानुसार जर युजरने चेहऱ्यावर मास्क लावला असेल तरी तो फोन अनलॉक करु शकणार आहे. आयफोन अनलॉक करण्यासाठी युझरला चेहऱ्यावरुन मास्क काढावा लागत आहे. अनलॉकचं हे फीचर अ‍ॅपल वॉचमध्येही दिलं जाणार आहे.

    (वाचा -  Women’s Day Special:‘ती’च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO )

    त्याचबरोबर आयओएस 14.5 Beta 2 मध्ये साईड जेश्चरदेखील (Side Gesture) आणलं जात आहे. यामुळे अ‍ॅपल म्युझिकमधील गाणी Now Playing Queue मध्ये किंवा थेट Apple Music Library मध्ये अ‍ॅड करता येणार आहेत. यासोबत आणखी एक Gesture जोडलं जाणार आहे. यामुळे अ‍ॅपल आयफोन आणि आयपॅड युजर प्ले लास्ट आणि शो अल्बम देखील केवळ एका बोटावर अ‍ॅक्सेस करु शकणार आहेत. तसंच कंपनी इमोजीज (Emoji) देखील अपग्रेड करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात