नवी दिल्ली, 10 एप्रिल : LIC च्या जीवन शांती स्किममध्ये (Jeevan Shanti Scheme) मिळणारं पेन्शन या पॉलिसीची विशेष बाब आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पेन्शनद्वारे भविष्यात सुरक्षा प्रदान करते. या पॉलिसीमध्ये 45 वर्षीय व्यक्तीने 10,00,000 रुपये पॉलिसीमध्ये लावल्यास, त्याला 74,300 वार्षिक पेन्शन मिळेल. ग्राहकाकडे 5, 10,15 किंवा 20 वर्षानंतर पेन्शन सुरू करण्याचा पर्याय आहे. 5, 10,15 किंवा 20 वर्षाच्या पर्यायात पेन्शनची रक्कम वाढेल, परंतु यासह काही नियम-अटीही आहेत. LIC ची जीवन शांती योजना एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे.
ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करता येईल पॉलिसी -
ही योजना ऑनलाईन आणि ऑफलाईनद्वारेही खरेदी करता येते. एलआयसी जीवन शांती एक व्यापक वार्षिक योजना आहे, ज्यात व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबियांनाही लाभ मिळेल.
पॉलिसीची वैशिष्ट्यं -
- हा सिंगल प्रीमियम डिपॉझिट पेन्शन प्लॅन आहे.
- लोनची सुविधा मिळते
- त्वरित किंवा 1 ते 20 वर्षांपर्यंत कधीही पेन्शनची सुरुवात करता येते.
- जॉईंट लाईफ ऑप्शनमध्ये कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला सामिल करता येतं.
- 10 लाखांच्या गुंतवणूकीवर 5 वर्षांनंतर पेन्शन सुरू केल्यास, यावर 9.18 टक्के रिटर्नच्या हिशोबाने वार्षिक पेन्शन मिळतं.
या वयोगटातील लोक घेऊ शकतात फायदा -
- LIC ची ही योजना कमीत-कमी 30 वर्ष आणि अधिकाधिक 85 वर्षापर्यंतचे व्यक्ती घेऊ शकतात.
- तात्काळ आणि स्थगित वार्षिकी दोन्ही पर्यायांसाठी पॉलिसी घेताना वार्षिक दरांची गॅरंटी दिली जाते.
- योजनेंतर्गत एकदा निवडलेला पर्याय बदलला जाऊ शकत नाही.
- ही योजना LIC च्या जुन्या जीवन अक्षय प्लॅनप्रमाणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC