नवी दिल्ली, 13 जानेवारी : Amazon च्या भागीदारीत Airtel ने भारतात एक एक्सक्लूसिव्ह प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन प्लॅन लाँच केला आहे. याची सुरुवातीची किंमत भारतात 89 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सिंगल युजर मोबाईल ओनली प्लॅन आहे. यात प्लॅनमध्ये एयरटेल युजर्स अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ SD क्लालिटीमध्ये स्ट्रिम करू शकणार आहेत. प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशनचा, भारतात लाँचिंगचा एक भाग म्हणून प्रीपेड प्लॅन्समध्ये एयरटेल ग्राहकांना याचं 30 दिवसांचं फ्री ट्रायल मिळेल. यासाठी युजर्सला एयरटेल थँक्स अॅपवरून मोबाईल नंबरद्वारे अॅमेझॉनवर साइनअप करावं लागेल. ही ऑफर आज दुपारी 2 वाजल्यापासून उपलब्ध आहे.
(वाचा - WhatsApp च्या नव्या पॉलिसीमुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका? वाचा हे FACTS )
Airtel प्राईम व्हिडीओ एडिशन प्लॅन्स - एअरटेलच्या ग्राहकांना जर 30 दिवसांच्या फ्री ट्रायलनंतर, हा प्लॅन सुरू ठेवायचा असल्यास त्यांना 89 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. या प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB डेटा आणि 28 दिवसांसाठी Amazon Prime Video चा अॅक्सेस मिळणार आहे. त्याशिवाय आणखी एक 299 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅनही आहे. यात अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग, दररोज 1.5 GB डेटा आणि Amazon prime Video मोबाईल एडिशनचा अॅक्सेस ग्राहकांना मिळणार आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे. पण, या मोबाईल ओनली प्रीपेड प्लॅनसह अॅमेझॉन प्राईमचे इतर बेनिफिट्स मिळणार नाहीत. युजर्स केवळ मूव्हीज, शोज आणि दुसरे व्हिडीओ पाहू शकतील. प्राईमचे इतर बेनिफिट्स मल्टी युजर अॅक्सेस, अॅड-फ्री प्राईम म्युझिक आणि फास्ट शॉपिंगसारखे इतर फायदे मोबाईल ओनली प्लॅनमध्ये मिळणार नाहीत.
(वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका; Google कडून YouTube अकाउंट सस्पेंड )
सर्व अॅमेझॉन प्राईम बेनिफिट्ससाठी ग्राहक 131 रुपयांचा प्लॅन घेऊ शकतात. या प्लॅनची 30 दिवसांची वॅलिडिटी आहे. एअरटेलचा 349 रुपयांचा आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपसह येतो. तसंच 28 दिवस वॅलिडिटी, फ्री कॉलिंग आणि 2GB डेटासह हा प्लॅन आहे. दरम्यान, Amazon चे भारतात प्राईम व्हिडीओ मेंबरशिपचे दोन प्लॅन आहेत. याचा महिन्याचा प्लॅन 129 रुपये आणि वार्षिक प्लॅन 999 रुपये इतका आहे.