Home /News /technology /

Amazon: खरेदी करा WiFi वर चालणारा गिझर, Alexa वरुनही देता येईल कमांड

Amazon: खरेदी करा WiFi वर चालणारा गिझर, Alexa वरुनही देता येईल कमांड

Amazon: थंडीच्या दिवसाच गिझरची वाढणारी मागणी लक्षात घेता काही 'स्मार्ट गिझर'वर Amazon च्या या सेलमध्ये सूट देण्यात आली आहे

मुंबई, 21 जानेवारी: सध्या ऑनलाईनचे युग आहे. यामुळे नागरिक मनोरंजनाच्या साधनांसोबतच अनेक घरगुती वस्तूसुद्धा फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांच्या माध्यमातूनच मागवतात. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलतीही दिल्या जातात. दरवर्षी हिवाळ्यातही वेगवेगळ्या साधनांना मागणी असते. यावर्षी देखील हिवाळ्यात काही महत्त्वाच्या प्रोडक्ट्सवर ऑनलाइन सूट मिळत आहे. Amazon ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देऊन नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या दिवसात गिझरची मागणी देखील वाढते. थंडीच्या दिवसाच गिझरची वाढणारी मागणी लक्षात घेता काही 'स्मार्ट गिझर'वर Amazon वर सूट देण्यात आली आहे. हे वाचा-बाईक-स्कूटर घेण्याचा विचार करताय?Budget 2022-23 आधी जाणून घ्या ही महत्त्वाची बाब 1-हॅवेल्स गिझर Havells Adonia I 15 Litres Smart Storage Water Heater/Geysers with Alexa Enabled, Ivory थंडीच्या दिवसात गरम पाणी वापरले जाते. यामुळे अ‍ॅमेझॉनने हॅवेल्स गिझरवर (Havells Geysers) सवलत दिली आहे. या गिझरची किंमत 23,865 रुपये आहे. मात्र, यावर 38 टक्के सवलत देण्यात आली आहे. ज्यामुळे हा ग्राहकांना फक्त 14,874 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये Alexa या तांत्रिक सहाय्यिकेची सोय आहे त्यामुळे तुम्ही केवळ आवाजाने कमांड देऊ शकता. 15 लिटरचा हा गिझर आहे. यात दिलेल्या एलईडी इंडिकेटरमुळे पाणी किती गरम आहे, हेदेखील कळू शकते. यात टायमर लावण्याची देखील सुविधा आहे. तसेच कोणत्याही तापमानावर याला सेट करू शकता. हे वाचा-108 MP कॅमेरासह Xiaomi 11T Pro लाँच, पहिल्याच सेलमध्ये मिळेल 10 हजारांची सूट 2-रॅकॉल्ड ओम्निस गिझर Racold Omnis Wi-Fi 25 Litres Vertical 5 Star Water Heater, White रॅकॉल्ड ओम्निस (Racold Omnis) या 25 लीटरच्या गिझरवरही सवलत जाहीर केली आहे. या गिझरची किंमत 19,990 रुपये आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनने 26 जानेवारीला दिलेल्या आकर्षक सवलतीच्या माध्यमातून ग्राहकांना हा केवळ 14,890 रुपयात मिळणार आहे. म्हणजे या गिझरवर पाच हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. हा स्मार्ट लर्निंगवाला गिझर आहे. जो वापर केल्यानुसार स्वतः तापमानावर लक्ष ठेवून नियंत्रित करतो. 25 लिटर क्षमतेचा गिझर आहे. हा वायफायला देखील जोडला जाऊ शकतो. यात titanium steel tank दिल्यामुळे तो टिकाऊ आहे. यात Auto Diagnosis आहे ज्या माध्यमातून स्वतः सर्व पॅरामीटर्सला तपासतो. यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक बसू देत नाही आणि ऑटो ऑफ होतो. या गिझरला 2 वर्षांची तर टँकवर 7 वर्षांची वॉरंटी आहे. याची BEE Star Rating 5 आहे.
First published:

Tags: Amazon

पुढील बातम्या