नवी दिल्ली, 18 जानेवारी : मारुति सुझुकीने (Maruti Suzuki) सोमवारी अपडेटेड सेलेरियोचं (Maruti Celerio) सीएनजी वेरिएंट (CNG) लाँच केलं आहे. हे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अनेक अपडेटसह जारी करण्यात आलं होतं. सध्या भारतीय बाजारात ही सर्वात अधिक फ्यूल एफिशिएंट पेट्रोल कार मानली जाते. मारुति सेलेरियो (Maruti Celerio) ग्राहकांसाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो.
मागील पाच वर्षात मारुति कार्सच्या विक्रीत 22 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा मारुति सुझुकीने केला आहे. मारुति सुझुकी देशात फॅक्ट्री फिटेड सीएनजी कार बाजारात आणण्यात सर्वात पुढे आहे. मारुति सुझुकीचे मार्केटिंग आणि विक्रीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं, की कंपनीकडे 8 CNG कार्सचा सर्वात मोठा पोर्टफोलियो असून जवळपास 9,50,000 एस-सीएनजी वाहनांची विक्री झाली आहे.
Celerio CNG मायलेज -
Celerio CNG चं वर्जन पेट्रोल मॉडेलप्रमाणेच डिझाइन आणि फीचर्ससह येतं. कंपनीने कारमध्ये केवळ एक बदल केला आहे, की एक सीएनजी टँक लावला आहे. याला 1.0-लीटर डुअल-जेट डुअल VVT K-Series इंजनद्वारे पॉवर मिळते, ज्याला 60 लीटर क्षमतेच्या CNG टँकसह जोडण्यात आलं आहे. Celerio CNG चं मायलेज 35.60 किलोमीटर प्रति किलो आहे.
Celerio CNG इंजिन -
Celerio CNG 82.1 Nm टॉर्क जनरेट करते, जो पेट्रोल वर्जनमध्ये मिळणाऱ्या 89 Nm हून कमी आहे. CNG मॉडेलमध्ये 56 hp पॉवर मिळते, जे पेट्रोल वर्जनच्या 64 hp तुलनेत कमी आहे.
Maruti Suzuki Celerio केवळ पेट्रोलवर 26.68 किमी प्रति लीटर मायलेज देते. तर CNG वेरिएंटमध्ये 35.60 किलोमीटरचं अंतर पार केलं जातं.
किंमत -
CNG Celerio ची एक्स शो-रुम किंमत 6.58 लाख आहे. भारतात ही कार लाँच झाल्यानंतर दोन महिन्यात नव्या सेलेरियोसाठी 25000 हून अधिक बुकिंग मिळालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.