Home /News /technology /

YouTube Music च्या स्मार्ट डाउनलोडचा वापर केलात का? भन्नाट आहे हे फीचर

YouTube Music च्या स्मार्ट डाउनलोडचा वापर केलात का? भन्नाट आहे हे फीचर

विविध कंपन्यांची स्पर्धा असतानाही म्युझिक ऑफरच्या विस्तृत श्रेणीमुळे युट्युबने (YouTube) स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. जाणून घ्या युट्युब म्युझिकच्या भन्नाट फीचरविषयी

मुंबई, 18 जानेवारी: 2019 मध्ये भारतात लाँच झाल्यापासून, युट्युब म्युझिक (YouTube Music) हा देशातील सर्वांत लोकप्रिय म्युझिक स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म (music streaming platforms) बनला आहे. या क्षेत्रात विविध कंपन्यांची स्पर्धा असतानाही म्युझिक ऑफरच्या विस्तृत श्रेणीमुळे युट्युबने (YouTube) स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. अनेक अ‍ॅप्स केवळ कलाकारांच्या ओरजिनल किंवा लेबल अल्बमपर्यंत (originals or label albums) मर्यादित आहेत. पण या अ‍ॅपमध्ये विविध गायकांची गाणी व म्युझिकची मोठी श्रेणी उपलब्ध आहे. त्यामुळेच या अ‍ॅपला इतरांपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होत आहे. युजर्सला त्यांच्या डिव्हाइसवर म्युझिक डाउनलोड करण्याचा आणि ते ऑफलाइन असताना ऐकण्याचा ऑप्शन या अ‍ॅपमध्ये आहे. यामधील 'स्मार्ट डाउनलोड' फीचर तुम्ही अनमीटर्ड इंटरनेट कनेक्शनला म्हणजे वाय-फाय इंटरनेटला कनेक्ट झालात की आपोआप म्युझिक डाउनलोड करायला लागतं. तुमच्या फोनची इंटरनल स्टोरेज मेमरी वाचवण्यासाठी या अ‍ॅपमधून डाउनलोड केलेले म्यूझिक हे तुमच्या फोनमधील एसडी कार्डमध्ये ( SD card ) शिफ्ट केले जाऊ शकतं. हे वाचा-मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला 62 लाखांचा गंडा म्युझिक एसडी कार्डमध्ये कसं कराल डाउनलोड ? - अ‍ॅपच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातील profile आयकॉनवर टॅप करा आणि त्यानंतर त्यामधील ‘Settings’ हा ऑप्शन निवडा - Settings ऑप्शन निवडल्यानंतर तिथे येणाऱ्या ऑप्शनमध्ये ‘Library and downloads’ वर टॅप करा. - इथे, SD कार्डवर म्युझिक डाउनलोड करण्यासाठी Show Device files हा ऑप्शन enable करा. - Use SD card हा ऑप्शन enable केल्याने 'स्मार्ट डाउनलोड' पर्याय आपोआप enable होईल, त्यानंतर तुम्हाला ‘Smart downloads’ शी संबंधित स्लायडर शेवटपर्यंत न्यावा लागेल, यामुळे 500 गाण्यांचे ऑटोमॅटिक स्मार्ट डाउनलोड enable होतील. -तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्मार्ट डाउनलोडला 1 ते 500 गाण्यांदरम्यान कोणत्याही संख्येपर्यंत मर्यादित ठेवू शकता. हे वाचा-तुम्हीही Google Chrome चा वापर करता? चुकूनही अपडेट करू नका हे ब्राउजर, बसेल फटका एकदा तुम्ही स्मार्ट डाउनलोड फीचर enable केल्यानंतर, युट्युब म्युझिक अ‍ॅप तुमचं आवडतं किंवा सर्वाधिक प्ले केलेलं गाणं आपोआप डाउनलोड करेल. याशिवाय, अ‍ॅप तुम्हाला आवडतील अशा गाण्यांचा अंदाजदेखील घेईल, आणि जेव्हा तुम्ही अनमीटर्ड इंटरनेट कनेक्शनला म्हणजे वाय-फाय इंटरनेटला कनेक्ट असाल, तेव्हा ते त्वरित डाउनलोड करेल. तुम्हाला यापैकी कोणतेही ऑटोमॅटिक डाउनलोड केलेलं गाणं आवडत नसल्यास, तुम्ही गाण्यावर लाँग टॅप करून ते काढून टाकण्यासाठी ‘Remove Download’ वर क्लिक करू शकता. हे वाचा-Online Fraud टाळण्यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवाच तुम्हाला काही गाणी डाउनलोड करायची असतील किंवा ती ऑफलाइन करायची असतील, तर ज्याप्रमाणे तुम्ही युट्युबवरील व्हिडिओ वैयक्तिक ट्रॅक आणि प्लेलिस्टसह ऑफलाइन सुरू करू शकता, तीच पद्धत येथे लागू होते. तुम्हाला एकच गाणं डाउनलोड करायचं असल्यास, फक्त गाण्यावरील ट्रिपल-डॉट आयकॉनवर टॅप करा आणि ‘Download’ ऑप्शनवर टॅप करा. संपूर्ण प्लेलिस्ट डाउनलोड करण्यासाठी, प्ले लिस्टवर फक्त लाँग टॅप करा, जेव्हा तुम्हाला ती दिसेल, तेव्हा ‘Download’ ऑप्शनवर टॅप करा. म्युझिकचे विविध अ‍ॅप सध्या येत आहेत. पण युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी युट्युब म्युझिक अॅप सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे.
First published:

पुढील बातम्या