जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Amazon Great Indian Festival 2021 ची घोषणा, डिस्काउंटसह मिळतील जबरदस्त ऑफर्स

Amazon Great Indian Festival 2021 ची घोषणा, डिस्काउंटसह मिळतील जबरदस्त ऑफर्स

Amazon Great Indian Festival 2021 ची घोषणा, डिस्काउंटसह मिळतील जबरदस्त ऑफर्स

Amazon ने आपल्या Great Indian Festival ची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 4 ऑक्टोबरपासून लाइव्ह होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : Amazon ने आपल्या Great Indian Festival ची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 4 ऑक्टोबरपासून लाइव्ह होणार आहे. हा सेल कधी संपेल याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Amazon Prime Members एक दिवस आधीच सेल ऑफर अॅक्सेस करू शकतात. प्राइम मेंबर्सला अॅडिशनल कॅशबॅक, एक्सटेंडेड No Cost EMI चा फायदाही मिळणार आहे. Amazon ने दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी 12 वाजता मेगा डिल्स रिवील केल्या जातील. सेलमध्ये प्राइम मेंबर्सला अनेक फायदे मिळतील. प्राइम मेंबर्सचं 15000 रुपयांपर्यंत अधिकचं सेव्हिंग होऊ शकतं. प्राइम मेंबर्सला फ्री स्क्रिन रिप्लेसमेंट आणि लोअर मंथली EMI चा फायदा मिळेल. ग्राहक इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडशिवाय आता मराठी आणि बांगलामध्येही शॉपिंग करू शकतील.

Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान

Instant Discount - 4 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या Amazon Great Indian Festival Sale मध्ये HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झेक्शन्सवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. Amazon बिजनेस ग्राहकांना सेलमध्ये ऑफर्स, डिस्काउंट, लोअर फेस्टिव प्राइज ऑफर्स, कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स मिळतील. तसंच या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटही आहे. या सेलमध्ये Samsung, Oneplus, Xiaomi, Sony, Boat, Lenovo, Asus, HP सारख्या ब्रँड्सचे 1000 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होणार आहेत.

फेस्टिव्ह सीजनआधी Flipkart मध्ये नोकरीची संधी, 4000 लोकांना मिळेल जॉब

Amazon Sale मध्ये स्मार्टफोन्स 6799 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत मिळतील. बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. तसंच केवळ 49 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत मोबाईल अॅक्सेसरिजही घेता येतील. No Cost EMI 1999 रुपयांपासून सुरू होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात