नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Flipkart ने एक मार्केटप्लेस मॉडेल लाँच केलं आहे, ज्याला Flipkart xtra असं नाव देण्यात आलं आहे. याद्वारे लोकांना, सर्विस एजेन्सीजना आणि टेक्निशियन्सला कमाईची संधी मिळेल. फ्लिपकार्टने फेस्टिव्ह सीजनआधी 4000 नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. हे पाऊल फ्लिपकार्टची पुरवठा साखळी मजबूत करेल, जेणेकरुन भारतभरातील ग्राहकांना शिपमेंट आणि सेवेची जलद सुविधा मिळेल. दरवर्षी दिवाळीच्या जवळपास Flipkart आणि Amazon सह अनेक ई-कॉमर्स कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि वस्तूंवरही ऑफर देतात. अशात फ्लिपकार्टने ऑनबोर्डिंग प्रोसेस अधिक सोपी करण्यासाठी Flipkart xtra एक App लाँच केलं आहे. इथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांचं वेरिफिकेशन या App द्वारे केलं जाईल. या App वर शैक्षणिक पात्रता, आधीचा नोकरीचा अनुभव यासारखे डिटेल्स द्यावे लागतील. हे नवं App देशभरातील हजारो व्यक्ती, टेक्निशियन आणि डिलिव्हरी पार्टनर म्हणून कमाईच्या संधी देण्यास मदत करेल. Flipkart Extra App वर कुठूनही साइन-अप करण्यासाठी आणि शिपमेंट देण्यासाठी आपल्या आवडीचं शेड्यूल निवडण्याची सुविधा मिळते. ‘विक्रेते, कारागिर, MSME किराणा आणि ग्राहक यांचा समावेश असलेली संस्था म्हणून आम्ही सातत्याने विस्तार करत आहोत. यामुळे देशाच्या आर्थिक सुधारणात योगदान देताना लोकांना उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोतही शोधण्यास मदत होईल’, अशी माहिती फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत बद्री यांनी दिली.
Flipkart Big Billion Days सेल या तारखेपासून सुरू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्के डिस्काउंटसह जबरदस्त डिल्स
दरम्यान, Flipkart वर Flipkart Big Billion Days सेल सुरू होणार आहे. या सेलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 7 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. सेलमध्ये अॅक्सिस बँक, ICICI बँकच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये Paytm वॉलेट आणि UPI ट्रान्झेक्शनद्वारे पेमेंट केल्यास एश्योर्ड कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निशिंग प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिल्स आहेत.