मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या दुसऱ्या साइट्सवर मिळते भरघोस ऑफर्स, बाजारभावावर 20 ते 50 टक्के मिळू शकते सू

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या दुसऱ्या साइट्सवर मिळते भरघोस ऑफर्स, बाजारभावावर 20 ते 50 टक्के मिळू शकते सू

गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅपल (Apple), टू गुड आदींच्या वेबसाइट येतील. यापैकी कोणत्याही वेबसाइटवर जाऊन तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता.

गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅपल (Apple), टू गुड आदींच्या वेबसाइट येतील. यापैकी कोणत्याही वेबसाइटवर जाऊन तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता.

गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅपल (Apple), टू गुड आदींच्या वेबसाइट येतील. यापैकी कोणत्याही वेबसाइटवर जाऊन तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता.

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: जर तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, स्वयंपाकघरातील वस्तू किंवा ऑफिस प्रॉडक्ट्स (office products) मूळ किंमतीपेक्षा (original price) खूप कमी किंमतीत खरेदी करायची असतील, तर तुम्ही अगदी सहज खरेदी करू शकता. तुम्हाला बाजारभावावर 20 ते 50 टक्के सूट मिळू शकते. याशिवाय उच्च-गुणवत्तेच्या प्रॉडक्टसह विक्रेत्यांकडून 6 महिन्यांची वॉरंटी मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त गुगलवर Refurbished Products एवढंच सर्च करावं लागेल. गुगलवर सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अ‍ॅमेझॉन (Amazon), अ‍ॅपल (Apple), टू गुड आदींच्या वेबसाइट येतील. यापैकी कोणत्याही वेबसाइटवर जाऊन तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉन आणि टू गुड या वेबसाइटवर तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांची प्रॉडक्ट्स मिळतील. अ‍ॅपलच्या वेबसाइटवर मात्र तुम्हाला फक्त अ‍ॅपल कंपनीचीच प्रॉडक्ट्स सापडतील. या वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाइटवर सर्टिफाइड रिफर्बिश्ड (Certified Refurbished) प्रॉडक्ट विकली जातात. ही प्रॉडक्ट त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा मोठ्या प्रमाणात सूट देऊन विकली जातात. पण सर्वांत प्रथम सर्टिफाइड रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. सर्टिफाइड रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स म्हणजे? सर्टिफाइड रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स म्हणजे अशी उत्पादनं, जी कोणीतरी खरेदी केली आहेत, आणि काही कारणामुळे पुन्हा कंपनीला परत केली आहेत. एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी केल्यानंतर तुम्हीही ती खराब असल्याचं कारण देत कधीतरी कंपनीला परत पाठवली असलेच. परंतु काही लोक एखादं प्रॉडक्ट हे एक किंवा दोन दिवस वापरल्यानंतर कंपनीला परत करतात. ग्राहकाने पाठवलेले हे प्रॉडक्ट नवीन प्रॉडक्ट म्हणून विकले जाऊ शकत नाही. कारण या प्रॉडक्टला स्क्रॅच गेलेले असतात किंवा इतर काही दोष त्यामध्ये असतो. अशा वस्तूंची पुनर्विक्री करण्यासाठी, कंपनी त्यांना रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स असं नाव देतात. परंतु साइटवर पुन्हा अशा प्रॉडक्ट्सची यादी टाकण्यापूर्वी, उत्पादक त्या प्रॉडक्टचं योग्य टेस्टिंग करतात. प्रॉडक्टमध्ये दोष असल्यास, तो दूर करतात आणि त्यानंतर पुन्हा विक्रीसाठी वेबसाइटवर टाकतात. हेही वाचा-  Instagram वर नवा ट्रेंड! कशी अपलोड कराल Drop your best sunset photos स्टोरी
 अशा वस्तूंची विक्री करताना हे रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स असल्याचे वेबसाइटवर नमूद करण्यात येते. संबंधित प्रॉडक्टला स्क्रॅच असू शकतात, परंतु ते नव्या प्रॉडक्ट सारखेच काम करेल, याचीही माहिती दिलेली असते. तसंच हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर कमीतकमी 6 महिन्यांची वॉरंटी देण्यात येते. 6 महिन्यांत प्रॉडक्टमध्ये काही दोष, अडचणी आल्यास विक्रेता एक तर ती अडचण दूर करेल किंवा नवीन प्रॉडक्ट देईल.
याशिवाय, कधीकधी डेमो प्रॉडक्ट देखील रिफर्बिश्ड प्रॉडक्ट्स म्हणून विकली जातात. कंपन्या लोकांना संबंधित प्रॉडक्टचा डेमो दाखवण्यासाठी काही प्रॉडक्ट वापरतात, त्याला डेमो प्रॉडक्ट म्हणतात. काही काळ वापरल्यानंतर कंपनी डेमो दाखवण्यासाठीचं प्रॉडक्ट बदलत असते. तसंच नवीन प्रॉडक्ट्सचं पॅकिंग करतानाही त्याला स्क्रॅच पडू शकतात. हेही वाचा-  मोठी बातमी! Facebook वर 'या' देशाने ठोठावला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड, वाचा काय आहे कारण
 हे उदाहरण बघा
समजा, एखाद्या व्यक्तीने लॅपटॉप विकत घेतला. हा लॅपटॉप त्याला पोहोच झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की लॅपटॉपची स्क्रीन डॅमेज झाली आहे, किंवा संबंधित व्यक्तीच्या हातातून लॅपटॉप पडला, व त्याची स्क्रीन डॅमेज झाली. हा लॅपटॉप व्रिकेत्याला परत करताना संबधित व्यक्तीने सांगितले की, जेव्हा मी बॉक्स उघडला होता, तेव्हा लॅपटॉपची स्क्रीन डॅमेज होती. त्यानंतर संबंधित विक्रेताने लॅपटॉप परत घेतला, व त्याबद्दल्यात नवीन लॅपटॉप दिला. पण संबंधित ग्राहकाने परत केलेल्या लॅपटॉपचं काय? हेही वाचा-  2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत
 अशा वेळी लॅपटॉपचं उत्पादन करणारी संबंधित कंपनी त्याची स्क्रीन बदलेल. जर लॅपटॉप वापरला असेल तर त्यामधील मेमरी डिलीट करेल. लॅपटॉपमधील इतर दुरुस्तीची कामंही केली जातील. त्यानंतर त्याचं टेस्टिंग करून तो पॅक करून त्याला रिफर्बिश्डचा टॅग लावला जाईल.
बघा रिफर्बिश्ड साइट्सवर पण कमी किमतीत चांगली उत्पादनं मिळतात. त्यामुळे तुम्हीही एखाद्यावेळी ट्राय करू शकता.
First published:

Tags: Amazon, Flipkart

पुढील बातम्या