Home /News /technology /

Instagram वर नवा ट्रेंड! कशी अपलोड कराल Drop your best sunset photos स्टोरी

Instagram वर नवा ट्रेंड! कशी अपलोड कराल Drop your best sunset photos स्टोरी

Drop ur best sunset photos असा ट्रेंड सध्या Instagram वर आहे. पण हा ट्रेंड कसा फॉलो करायचा? यात स्टोरी कशी अपलोड करायची हे माहितेय का?

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : जर तुम्ही Instagram वापरत असाल, तर अनेकांच्या स्टोरीमध्ये सनसेट फोटो पाहिले असतील. इन्स्टाग्रामने नुकतंच हे नवं फीचर लाँच केलं आहे. या फीचर Drop ur best sunset photos असं ओळखलं जात आहे. हा नवा ट्रेंड असून यात एका जुन्या फीचरवर काम सुरू आहे. Instagram चं हे नवं फीचर खास सनसेट फोटोसाठी तयार करण्यात आलेलं नाही. परंतु सध्या ट्रेंडिंगमुळे Drop ur best sunset photos हेच ट्रेंड होत आहे. यात युजर्स आपल्या आवडीचा सनसेटचा फोटो अपलोड करत असून या ट्रेंडला युजर्सचा मोठा रिस्पॉन्सही मिळतो आहे. तुमचं इन्स्टाग्रामही अशा ट्रेंडने भरलेलं पाहायला मिळालं असेल. पण हा ट्रेंड कसा फॉलो करायचा? यात स्टोरी कशी अपलोड करायची हे माहितेय का? कसं अपलोड कराल Drop ur best sunset photos? Instagram वर सध्या सर्वात लेटेस्ट अपडेट Drop ur best sunset photos आहे. याच्या मदतीने Insta Users अल्बम फॉर्मेटमध्ये फोटो अपलोड करू शकतात. हे फीचर अतिशय पॉप्युलर झालं असून यावर आतापर्यंत 10 लाखहून अधिक फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यावेळी एक युजर एखादा फोटो शेअर करुन त्यावर drop your best sunset असं कॅप्शन देतो, त्यानंतर दुसरा युजर त्या फोटोवर आपला फोटो अपलोड करतो आणि ही एक चेंन तयार होते.

  Smartphoneखरेदी करताना भारतीय सर्वात आधी पाहतात ही गोष्ट,नव्या रिसर्चमधून खुलासा

  या ट्रेंडमध्ये सामिल होण्यासाठी सर्वात आधी एखाद्या युजरच्या सनसेट स्टोरीवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा बॉक्स दिसेल, ज्याचं टायटल drop your best sunset photo असेल. जसं बॉक्सवर क्लिक कराल, तसं स्क्रिनवर खालच्या बाजूला ब्लू बॉक्समध्ये Click Here लिहिलेलं असेल. त्यानंतर कॅमेरा ओपन होईल. आता आवडीचा फोटो सिलेक्ट करू शकता किंवा क्लिक करू शकता. त्यानंतर तुमचा फोटो किंवा व्हिडीओ त्या चेंनमध्ये सामिल होईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Instagram, Instagram post

  पुढील बातम्या