नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: फेसबुकला मोठा झटका ब्रिटनकडून मिळाला आहे. ब्रिटनने सोशल मीडिया साइट फेसबुकवर (The UK fines Facebook) मोठा दंड ठोठावला आहे. माहिती भंग प्रकरणात (Information Breach) ब्रिटनने मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg Facebook) यांच्या फेसबुकवर हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या सोशल मीडिया कंपनीवर 500 कोटी रुपयांहून अधिक (5 कोटी डॉलरपेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे.
फेसबुकने जाणीवपूर्वक केले उल्लंघन: सीएमए
GIF प्लॅटफॉर्म Giphy च्या खरेदीनंतर तपासादरम्यान नियामक आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाने (सीएमए) असे म्हटले आहे की फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झालं होतं. सीएमएने म्हटलं की कोणतीही कंपनी कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही.
वाचा-Facebook चं नाव बदलणार? जाणून घ्या इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे काय आहे कारण
फेसबुक जिफीच्या अधिग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरल्याचे CMA चे म्हणणे आहे. याखेरीज, फेसबुक देखील तपासादरम्यान जिफीचे त्यांच्या प्लॅटफॉर्मसह ऑपरेट करण्यात अपयशी ठरले आहे.
The UK fines Facebook over £50 million for information breach, reports AFP pic.twitter.com/gK4anUQFhK
— ANI (@ANI) October 20, 2021
नियामकाने अशी माहिती दिली आहे की फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती प्रदान केलेली नाही. यासंदर्भात FB ला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता.
रिपोर्टनुसार, फेसबुक त्याच्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. कंपनी फेसबुक अॅप व्यतिरिक्त इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, Oculus साठी नवीन नावे देखील जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook