मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Amazon यूजर्ससाठी मोठी बातमी; कंपनीने बंद केली 'ही' सर्विस, आता मिळेल असा पर्याय

Amazon यूजर्ससाठी मोठी बातमी; कंपनीने बंद केली 'ही' सर्विस, आता मिळेल असा पर्याय

शॉपिंग, ऑर्डर ट्रॅक करणं आणि कस्टमर केअरशी संपर्क करणं यासारख्या सेवांसाठी एकच सुविधाजनक अ‍ॅप बनवण्यात आलं आहे.

शॉपिंग, ऑर्डर ट्रॅक करणं आणि कस्टमर केअरशी संपर्क करणं यासारख्या सेवांसाठी एकच सुविधाजनक अ‍ॅप बनवण्यात आलं आहे.

शॉपिंग, ऑर्डर ट्रॅक करणं आणि कस्टमर केअरशी संपर्क करणं यासारख्या सेवांसाठी एकच सुविधाजनक अ‍ॅप बनवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 23 मे : ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) भारतात आपली Prime Now सर्विस बंद केली आहे. हा कंपनीचा ग्रॉसरी डिलीव्हरी प्लॅटफॉर्म आहे. यात ग्रॉसरीसह इलेक्ट्रॉनिक, होम आणि किचनचं आवश्यक सामान मिळतं. Prime Now दोन तासांत सामानाची डिलीव्हरी करणाचा दावा करतं. अ‍ॅमेझॉन Prime Now केवळ अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठीचं होतं. परंतु आता कंपनीने हे Prime Now आता बंद केलं आहे. आता युजर्सला एका वेगळ्या पर्यायात सामान अ‍ॅमेझॉनच्या मेन साईटवर मिळेल.

मेन अ‍ॅप आणि वेबसाईटवर मिळेल सर्विस -

कंपनीचा Two Hour डिलीव्हरी ऑप्शन आता अ‍ॅमेझॉनच्या मेन अ‍ॅप आणि वेबसाईटवर मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत, जपान आणि सिंगापूरमध्ये Prime Now अ‍ॅमेझॉनवर शिफ्ट केलं आहे. त्यासोबतच Prime Now App आणि वेबसाईट बंद केली आहे. Prime Now पहिल्यांदा 2014 मध्ये न्यूयॉर्कमध्ये लाँच करण्यात आलं होतं.

Prime Now बंद केल्यानंतर आता अ‍ॅमेझॉन आपल्या थर्ड पार्टी पार्टनर्स आणि लोकल स्टोर्सला अ‍ॅमेझॉनसह जोडतील, अशी माहिती अ‍ॅमेझॉन ग्रॉसरी डिपार्टमेंटच्या उपाध्यक्ष स्टेफिनी लँड्री यांनी सांगितलं.

(वाचा - Google चं भन्नाट फीचर, तुम्ही सर्च केलेली माहिती खरी की खोटी? गुगल देणार डिटेल्स)

एकाच अ‍ॅपवर मिळतील अनेक सर्विस -

शॉपिंग, ऑर्डर ट्रॅक करणं आणि कस्टमर केअरशी संपर्क करणं यासारख्या सेवांसाठी एकच सुविधाजनक अ‍ॅप बनवण्यात आलं आहे. दररोज वापर होणाऱ्या वस्तू, गिफ्ट्स, टॉईज, हाय क्वालिटी ग्रोसरी अशा Prime Now वर मिळणाऱ्या वस्तू आता अ‍ॅमेझॉनवरच उपलब्ध होतील.

Amazon Fresh -

अ‍ॅमेझॉन फ्रेश, कंपनीच्या मेन अ‍ॅपमध्येच असलेलं ग्रॉसरी स्टोर आहे. अ‍ॅमेझॉन फ्रेश गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत याची सर्विस बेंगळुरूपर्यंतच सीमित होती, परंतु आता ही सर्विस दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबाद सारख्या आणखीन 6 शहरात सुरू केली आहे.

First published:

Tags: Amazon, Amazon subscription, Tech news