नवी दिल्ली, 9 मार्च: देशभरात सोमवारी लाखो नागरिकांनी एसएमएस (SMS) आणि ओटीपी (OTP) मिळण्यास उशीर होत असल्याचा किंवा एसएमएस येतच नसल्याचा अनुभव घेतला. त्यामुळं सगळीकडे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, ई-कॉमर्स सर्व्हिसेससह कोविड लसीसाठी आवश्यक असणाऱ्या को-विन अॅपवरील (Co-Win App) नोंदणी सेवादेखील यामुळं ठप्प झाली होती. त्यामुळं लाखो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. इकॉनॉमिक टाइम्सच्या (ET) बातमीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत 40 टक्के एसएमएस आणि ओटीपी सेवा विस्कळीत झाली होती. यामागे कोणताही घातपात किंवा अपघात नव्हता, तर टेलिकॉम कंपन्यांनी व्यावसायिक जाहिरातींच्या एसएमएसबाबतच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असल्यानं, त्याचा परिणाम एसएमएस सेवेवर झाला होता. वैतागलेल्या असंख्य नागरिकांनी ट्विटरवर आपलं गाऱ्हाणे मांडले. अनेकांनी आपले महत्त्वाचे बँक व्यवहार यामुळं रखडल्याचे सांगितले, तर आपल्याला येत असलेल्या अडचणी मांडल्या. या मागचे कारण जाणून घेण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. काही ट्विटर युजर्सनी या गोंधळाचा दोष ब्लॉकचेनला दिला आहे.
Without the OTPs coming in how am I suppose to do bank transactions? I don’t even remember my user name and password for online banking 😣😣
— Bailey’s Comet (@lakey_musings) March 9, 2021
@MaxBupa hello, OTP is not coming from mobile app login. Please check the issue . #login #iosapp
— Prashant Sharma (@prashantsharm_) March 9, 2021
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, टेलिफोन ऑपरेटर्सनी नवीन डीएलटी प्रक्रिया लागू केल्यानं त्याचा परिणाम नोटिफिकेशन्स पाठवण्यावर झाला आहे. डीस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) ही ब्लॉकचेन आधारित नोंदणी प्रणाली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं (TRAI-Telecom Regulatory Authority of India) दूरसंचार ऑपरेटर्सना (Telecom Operators) ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या बल्क एसएमएसबाबत लागू करण्यात आलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असल्यानं त्याचा फटका ओटीपी पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या एसएमएस सेवेलाही बसला. लाखो ग्राहकांना बँकेचे व्यवहार करताना ओटीपी मिळू शकले नाहीत, त्यामुळं बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाले. बँकिंग व्यवस्थेवर झालेल्या या परिणामाची आणि नागरिकांच्या तक्रारींची दाखल घेत भारतीय बँक असोसिएशननं ट्राय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडं (Reserve Bank of India) ही समस्या मांडली आणि ही अंमलबजावणी पुढं ढकलण्यास सांगितलं आहे. हे वाचा - तुमच्यावर कुणाची नजर तर नाही ना? आता Apple च्या या फीचरमधून मिळणार ALERT दूरसंचार नियामक ट्रायच्या(TRAI) म्हणण्यानुसार, टेलिमार्केटर्सना डीएलटी (DLT) प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. तर व्यावसायिक जाहिरातींचे संदेश पाठवणाऱ्या सर्व कंपन्यांना 7 मार्चपूर्वी नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले होते, असं स्पष्टीकरण टेलीकॉम ऑपरेटर्सनी दिलं आहे.