नवी दिल्ली, 24 डिसेंबर : देशभरात 1 जानेवारीपासून सर्व वाहनांना FASTag लावणं अनिवार्य असणार आहे. आरटीओने याच पार्श्वभूमीवर नियम आणखी कडक केले आहेत. 25 डिसेंबरनंतर, नव्या गाडीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी RTO ऑफिसमध्ये (RTO new rule) येणाऱ्या व्यक्तीच्या गाडीला सर्वात आधी फास्टॅग लावणं गरजेचं आहे. देशभरात सर्व डीलर्सला याबाबत माहिती देण्यात आली असून या नियमाचं सक्तीने पालन करण्याचं सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक एन.एन गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकांना जागरुक करणे आणि नियमांचं पालन होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
(वाचा - तुमच्याकडे Maruti ची गाडी आहे? मिळेल या जबरदस्त ऑफरचा फायदा )
केंद्र सरकारकडूनही सर्व चार चाकी वाहनांवर 1 जानेवारीनंतर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. www.fastag.org वर FASTag साठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. कोणत्याही नव्या गाडीचं रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी, गाडीला FASTag लावणं आवश्यक आहे.
(वाचा - कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस )
कसा खरेदी कराल FASTag - राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाजा आणि 22 विविध बँकांमधून फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो. FASTag पेटीएम, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank ही फास्टॅग देतात.
(वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज )
कसा कराल रिचार्ज - - फास्टॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रीप्रेड वॉलेटशी जोडला असल्यास, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, नेट बँकिंगच्या माध्यमातून रिचार्ज केला जाऊ शकतो. - जर बँक खातं फास्टॅगशी लिंक असल्यास, पैसे थेट बँक खात्यातून कट केले जातील. - जर फास्टॅग Paytm वॉलेटशी लिंक असल्यास, पैसे वॉलेटमधून कट केले जातील.