तुमच्याकडे Maruti ची गाडी आहे? मिळेल या जबरदस्त ऑफरचा फायदा

नव्या वर्षात मारुती सुझुकीच्या कार महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, त्याच्या किंमतीवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे दर वाढवणं भाग पडतं असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

नव्या वर्षात मारुती सुझुकीच्या कार महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, त्याच्या किंमतीवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे दर वाढवणं भाग पडतं असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 डिसेंबर : तुमच्याकडे Maruti ची कोणतीही कार असल्यास चांगली ऑफर मिळू शकते. चांगल्या ऑफर्ससह सर्विसिंग करण्याचीही संधी मिळणार आहे. मारुतीने विंटर सर्विस कॅम्पेन (Maruti Suzuki Winter Service Campaign) सुरू केलं आहे. हे विंटर सर्विस कॅम्पेन 5 जानेवारी 2021 पर्यंत सुरू असणार आहे. कंपनीने यात आपल्या ग्राहकांना 27 पॉईंट व्हीकल चेकअप फ्रीमध्ये (27 point vehicle check-free) उपलब्ध करून दिलं आहे. हा कॅम्प देशभरात ऑथोराइज्ड डीलरशीपमध्ये लावण्यात आला आहे. काय आहे ऑफर - या Campaign अंतर्गत सर्विस लेबर चार्ज, एक्सटेंडेड वॉरंटी, स्पेयर पार्ट्स खरेदी केल्यास Washing ची सुविधा Complimentary मिळणार आहे. कंपनीच्या या सर्विस कॅम्पमध्ये कस्टमर्सला फ्री 27 पॉईंट व्हीकल चेकअपशिवाय एक्सेसरीजवर ऑफर्सचा फायदा मिळणार आहे. यात लाइटनिंग, हीटिंग, वेंटिलेशन सिस्टम, बॅटरी, ब्रेक आणि इतर गोष्टींचं इंस्पेक्शन होईल. या ऑफरमध्ये ट्रेंड आणि एक्सपर्ट टेक्निशियन चेकलिस्टनुसार ग्राहकांच्या कारची पाहाणी करतील.

  (वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज)

  मारुती सुझुकीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार नवे पर्याय उपलब्ध करून देण्यासह, ग्राहककेंद्रित Financial products सामिल करत आहे. या थंडीच्या हंगामात ग्राहकांना कारचा एक सुखद अनुभव मिळावा, हा विंटर सर्विस कॅम्पेनचा हेतू असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

  (वाचा - भारतात 5G नेटवर्क नाही, तरीही 5G स्मार्टफोन खरेदी करावा का?)

  नव्या वर्षात महाग होणार कार्स - नव्या वर्षात मारुती सुझुकीच्या कार महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, त्याच्या किंमतीवरही दबाव वाढला आहे. त्यामुळे दर वाढवणं भाग पडतं असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: