Home /News /technology /

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नोटिफिकेशनद्वारा, जर तुमच्या गाडीवर लावण्यात आलेला फास्टॅग योग्यरित्या काम करत नसेल, किंवा त्यात बँलेन्स नसल्यास तो चालक टोल प्लाजाच्या फास्टॅग लेनमध्ये घुसल्यास, दुप्पट टॅक्स वसूल केला जाईल. आदेशानुसार, FASTag असणं आवश्यक आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 डिसेंबर : संपूर्ण देशात सर्व चार चाकी गाड्यांसाठी FASTag लावणं आवश्यक आहे. परंतु तुमच्या फोर व्हिलरला तुम्ही अजूनही FASTag लावला नसल्यास, विना फास्टॅग नॅशनल हायवे टोल प्लाजावरून कोणत्याही पेनल्टीशिवाय (Penalty) जाता येईल. जुन्या गाड्यांनाही फास्टॅग अनिवार्य आहे. FASTag न लावल्यास, टोलवर दुप्पट पैसे वसूल करण्याचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं, परंतु यादरम्यान आता एक चांगली अपडेट आहे. सध्या दुप्पट पैसे आकारण्यात येणार नाही. नॅशनल हायवेवरील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता, दुप्पट पैसे न आकारण्यात सुविधा देण्यात आली आहे, याचा फायदा ज्यांनी अद्यापही FASTag लावला नाही त्यांना होणार आहे. 1 जानेवारीपासून बदलणार FASTag लेन - 1 जानेवारी, 2021 पासून टोल प्लाजावरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड FASTag मध्ये बदलल्या जातील. या अंतर्गत हळू-हळू सर्व लेनला डेडिकेटेड फास्टॅगमध्ये बदललं जाईल. यामुळे कोणत्याही टोल प्लाजावर रोख पैसे दिले जाणार नाहीत. त्यामुळे जर 1 जानेवारी, 2021 पासून तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून जाणार नाही. FASTag नसल्यास खरेदी करा प्री पेड कार्ड - जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर प्री पेड टच अँड गो कार्डचा (Prepaid touch and go card) वापर करावा लागेल. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), टोल प्लाजावरील गर्दी रोखण्यासाठी, जानेवारीपासून सर्व हायब्रिड लेनवर प्री पेड कार्डची सुरुवात करेल. हे प्री पेड कार्ड रोख व्यवहाराचा पर्याय म्हणून काम करेल. त्यामुळे कारवर FASTag नसेल, तर टोल प्लाजावर पॉइंट ऑफ सेल्सने (PoS) हे प्री पेड कार्ड खरेदी करता येईल. FASTag च्या जागी या कार्ड्सचा वापर करुन टोलवर दुप्पट रक्कम वसूल केली जाणार नाही. प्री पेड कार्ड रिचार्ज - फास्टॅग असला तरीही या कार्डचा वापर केला जाऊ शकतो. FASTag ब्लॅकलिस्ट झाल्यास किंवा फेल झाल्यास, या प्री पेड कार्डवरून टोल भरता येईल. प्री पेड कार्ड खरेदी आणि रिचार्ज करण्यासाठी टोल प्लाजावर दोन PoS-पॉइंट ऑफ सेल्स बनवण्यात येतील. हे कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहक याला नेट बँकिंग किंवा PoS वरही रिचार्ज करू शकतात. प्रत्येक टोल प्लाजावर पैसे भरण्यासाठी दोन लेन आहेत. मात्र 1 जानेवारीपासून लेन बंद होणार आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नोटिफिकेशनद्वारा, जर तुमच्या गाडीवर लावण्यात आलेला फास्टॅग योग्यरित्या काम करत नसेल, किंवा त्यात बँलेन्स नसल्यास तो चालक टोल प्लाजाच्या फास्टॅग लेनमध्ये घुसल्यास, दुप्पट टॅक्स वसूल केला जाईल. आदेशानुसार, FASTag असणं आवश्यक आहे. कसं काम करतो FASTag - गाडी टोल प्लाजाजवळ आल्यास, टोल प्लाजावरील सेंसर तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रिनवर लावलेल्या फास्टॅगला ट्रॅक करतो. त्यानंतर तुमच्या फास्टॅग अकाउंटमधून त्या टोल प्लाजावर पैसे कट होतात. रोख पैसे न देता अशाप्रकारे टोल भरता येईल. वाहनात लावलेला हा टॅग तुमचं प्रीपेड खातं सक्रीय झालं की काम करण्यास सुरुवात करतो. फास्टॅग अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावं लागेल. कसा खरेदी कराल FASTag - राष्ट्रीय राजमार्ग टोल प्लाजा आणि 22 विविध बँकांमधून फास्टॅग खरेदी केला जाऊ शकतो. हा पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. त्याशिवाय Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank ही फास्टॅग जारी करते. कसा कराल रिचार्ज - - फास्टॅग प्रीपेड वॉलेटशी जोडला असल्यास, याला यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकिंगच्या माध्यमातून रिचार्ज केलं जाऊ शकतं. - जर बँक खातं फास्टॅगशी लिंक असल्यास, पैसे थेट खात्यातून कट होतील. - Paytm वॉलेट फास्टॅगशी लिंक असल्यास, पैसे Paytm वॉलेटमधून कट होतील.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Car, Toll news, Toll plaza

    पुढील बातम्या