नवी दिल्ली, 06 ऑगस्ट: देशातील एक महत्त्वाची टेलिकॉम कंपनी (Telecom Company in India) असणाऱ्या एअरटेलच्या (Airtel) ग्राहकांना शुक्रवारी एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. कंपनीने ग्राहकांना (Airtel Customers) पाठवलेल्या एका मेसेजमुळे पुन्हा दुसरा मेसेज पाठवून त्यांची माफी मागावी लागली आहे. कंपनीकडून आलेला हा मेसेज पाहून सुरुवातीला ग्राहकही आश्चर्यचकित झाले होते. कंपनीने पहिला असा मेसेज केला की तुमच्या आउटगोइंग सेवा बंद (SMS regarding deactivation of outgoing Services) करण्यात आल्या आहेत, मात्र या मेसेजनंतरही ग्राहकांच्या सेवा सुरू होत्या.
काय आहे प्रकरण?
एअरटेल या टेलिकॉम कंपनीने ग्राहकांना असा मेसेज केला होता की, 'तुमची आउटगोइंग सेवा बंद करण्यात आली आहे. सुरी करण्यासाठी airtel.in/Prepaid-recharge यावर क्लिक करा किंवा *121*51# हा क्रमांक डायल करा'. यानंतर कंपनीने ग्राहकांना आणखी एक मेसेज पाठवला होता आणि दिलगिरी व्यक्त केली होती.
हे वाचा-शाओमीचा Smart Fan लवकरच होणार भारतात Launch
कंपनीने पाठवलेल्या दुसऱ्या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, काही तांत्रिक समस्येमुळे डिअॅक्टिव्हेशनचा मेसेज ग्राहकांना पाठवला गेला. ज्यामुळे कंपनी दिलगिरी व्यक्त करत आहे.
Hi Vijay, due to a technical error at our end you may have received a wrong SMS regarding deactivation of services. Please ignore the same. We are sorry for the inconvenience cause. Thank you, Amit https://t.co/2G23qpsqlP
— Airtel Cares (@Airtel_Presence) August 6, 2021
काही ग्राहकांनी ट्वीट करुनही कंपनीकडे तक्रार केली होती. ट्विटरच्या प्लॅटफॉर्मवरुनही कंपनीने हेच कारण दिलं आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे हा मेसेज गेला आहे. कंपनीने ट्विटरवरुन देखील खेद व्यक्त केला आहे.
हे वाचा-iPhone 13 असणार Made in China; आयफोनबाबत धक्कादायक खुलासा; काय आहे सत्य?
एअरटेल ही देशभरातील टेलिकॉम कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी इंडियाच्या (TRAI) च्या माहितीनुसार देशभरात एअरटेलटे 348.28 मिलियन सब्सक्रायबर्स (Wireless) आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.